Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड मधील औद्योगिक क्षेत्रातील ढिसाळ कचरा व्यवस्थापनामुळे उद्योजक व नागरिकांचे हाल!

महाराष्ट्र 14 न्यूज : औद्योगिक क्षेत्रातील कचरा सर्रासपणे जाळला जात आहे. त्यामुळे हवेचे प्रदूषण वाढत आहे. कचरा महानगरपालिकेने उचलायचा की एमआयडीसीने उचलायचा यात संभ्रमावस्था निर्माण झाली असल्याने कचरा उचलला जात नाही. त्यामुळे तो जाळला जात आहे. परिणामी औद्योगिक व लगतच इंद्रायणी नगर व मोशी प्राधिकरण या रहिवासी परिसरातील हवा दूषित होण्यामध्ये भर पडत आहे.
औद्योगिक क्षेत्रात मूलभूत सोयी- सुविधांसाठी महानगरपालिका कर गोळा करते. या सोयी सुविधा महानगरपालिकेनेच देणे आवश्यक असताना आरोग्य विभागाकडून कचरा उचलणे संदर्भात विलंब होत असल्याचे निर्दशनास आले,

त्यामुळे विविध कारखान्याच्या समोर असलेल्या मोकळ्या भूखंडावर कचरा साठून दुर्गंधी पसरत डासांची उत्पत्ती होत असून कामगारांना त्याला समोरे जावं लागत असल्याचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्री शिवराज लांडगे यांनी सांगितलं. ह्या संदर्भात महानगरपालिकेने त्वरित नियोजन करून नागरिकांची या त्रासातून लवकरात लवकर मुक्तता करावी अशी मागणी शिवराज लांडगे यांनी ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अण्णा बोदाडे यांच्याकडे पत्राद्वारे केली.

Google Ad

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!