Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पुणे पदवीधर भाजपचे उमेदवार ‘संग्राम देशमुख’ प्रचारात आघाडीवर … शहर भाजपची ठरली रणनिती!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे पदवीधर मतदार संघातील निवडणुकीच्या रणधुमाळीने जोर धरला असून यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड हे याचे मुख्य केंद्र असणार हे आता स्पष्ट झाले आहे. भाजपच्या ‘संग्राम देशमुख’ यांच्या प्रचाराकरीता आज पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या वतीने पिंपरी येथील पक्ष कार्यालयात नगरसेवक, पदाधिकारी व बुथप्रमुख यांची प्रभाग निहाय बैठक घेऊन यावेळी शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचारयंत्रणा सक्षम करण्याच्या सूचना देण्यात आल्या .

यावेळी महापौर माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, उमा खापरे, सदाशिव खाडे, राजेंद्र राजापूरे यांच्यासह नगरसेवक , पदाधिकारी व महिला पदाधिकारी उपस्थित होते . पुणे पदवीधर मतदारसंघासाठी सर्वाधिक मतदार हे पुणे व पिंपरी – चिंचवड शहरात आहेत . त्या पाठोपाठ सांगली , कोल्हापूर , सातारा आणि सोलापूरमध्ये मतदार आहेत . पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मागील निवडणुकीत १५ टक्के मतदान झाले होते .

Google Ad

यावेळी भाजपने केलेल्या नोंदणीमुळे मतदारांची संख्याही वाढली असून मतदानाचा टक्का ही वाढण्याची चिन्हे आहेत, आणि त्याचा फायदा संग्राम देशमुख यांना होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मतदानासाठी अधिकाधिक मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करावे, असे भारतीय जनता पक्षाच्या आज पिंपरी येथे प्रभाग निहाय झालेल्या बैठकीत सांगण्यात आले. तसेच मतदान केंद्र आणि मतदान प्रक्रिया यावर मार्गदर्शन करण्यात आले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

78 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!