Google Ad
Editor Choice Maharashtra

Sangli : सरकारचा निष्काळजीपणा आणि चुकीचे नियोजन यामुळे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली – चंदक्रांत पाटील

महाराष्ट्र 14 न्यूज : सुरुवातीपासून कोरोनाकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही.या कठीण काळात जनतेला आधार दिला गेला नाही.राज्य सरकारचे चुकीचे नियोजन आणि निष्काळजीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे,असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.त्यामुळे,राज्य सरकारने आतातरी आपल्या जबाबदाऱ्या योग्यरीत्या पार पाडाव्यात,असेही आवाहान चंदक्रांत पाटील यांनी केले आहे.

राज्य सरकारच्या अपयशी कारभारामुळे राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि मृत्युदर वाढत चालला आहे.याच पार्श्वभूमीवर मिरज येथील सरकारी मेडिकल कॉलेज येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी बैठक घेऊन येथील प्रश्नांवर चर्चा केली.तसेच सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.यावेळी ते बोलत होते.

Google Ad

पुढे बोलताना ते म्हणाले की,सांगली जिल्ह्यात देखील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे.राज्यभरात कोरोना चाचण्यांचे प्रमाण घटले आहे.ऑक्सिजनयुक्त बेड्स आणि व्हेंटिलेटर्सची कमतरता भासत आहे.त्यामुळे,या सर्व गोष्टींकडे राज्य सरकारने अधिक लक्ष्य देण्याची आवश्यकता आहे,असेही ते यावेळी म्हणाले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!