Google Ad
Editor Choice india

U.P. : आग्रा येथील मुघल संग्रहालयाला योगी सरकारने दिलं … छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव

महाराष्ट्र 14 न्यूज : उत्तर प्रदेशातील आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलण्यात आलं आहे. मोघल संग्रहालयाला आता छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय असे नाव दिले गेले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबतची माहिती दिली आहे.या निर्णयाची माहिती मुख्यमंत्र्यांनी एका ट्विटमध्ये दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की,

‘आग्रामध्ये निर्माणाधीन संग्रहालय ‘छत्रपती शिवाजी महाराज ‘ म्हणून ओळखले जाईल. आपल्या नवीन उत्तर प्रदेशात गुलामगिरीच्या मानसिकतेच्या चिन्हांना स्थान नाही. आमचे नायक छत्रपती शिवाजी महाराज आहे. जय हिंद जय भारत.’

आग्र्यामध्ये मुघल संग्रहालयाचे बांधकाम सुरू आहे. पण या संग्रहालयाचे नाव बदलण्यात येत असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलंय. आग्रामधील संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव देण्यात आले आहे, अशी घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली. ऐतिहासिक ताजमहालच्या पूर्वेकडील द्वारावर हे संग्रहालय बांधण्यात येत आहे. सुमारे दीडशे कोटींचा हा प्रकल्प आहे

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!