Google Ad
Editor Choice Maharashtra

Jalgaon : एकनाथ खडसेंच्या पक्षांतराचा मुहूर्त ठरला … ‘ या ‘ तारखेला आजी – माजी आमदारांसह हातात घड्याळ बांधणार ?

महाराष्ट्र 14 न्यूज : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय. मुक्ताईनगर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे.

सोमवारी मुक्ताईनगर येथे बैठक झाली. त्यास धुळे जिल्ह्यातील शिवसेना, भाजपचे त्यांचे समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत ठरल्याप्रमाणे हा प्रवेश सोहळा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. धुळे ग्रामीणचे शिवसेनेचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांचा प्रचार केला होता. त्यानंतर गेल्या काही महिन्यापासून त्यांचीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाची चर्चा सुरु होती. आता ते सुद्धा खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीत जाणार आहे.

Google Ad

येत्या शनिवारी खडसेंविषयींच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्‍यता आहे. कारण, खडसे यांचा राष्ट्रवादीमध्ये १७ ऑक्‍टोबर रोजी प्रवेश होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून तसंच विधानसभा निवडणुकीत उमेदवारीही नाकारल्यानंतर खडसे नाराज होते. त्यामुळे आता खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची चर्चा सुरू झालीये.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!