Google Ad
Sports

आमदार ‘लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या फुल पिच टेनिस बॉल आमदार चषक क्रिकेट स्पर्धेची … सांगवी येथील पीडब्लूडी मैदानात दिमाखात सुरुवात!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० डिसेंबर) : चिंचवड विधानसभेचे ‘आमदार लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या वाढदिवसानिमित्त फुल पिच टेनिस बॉल आमदार चषक क्रिकेट स्पर्धाचे आयोजन माजी नगरसेवक ‘शंकरशेठ जगताप’ यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी येथील पी डब्लू डी मैदान येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आज (दि.३० डिसेंबर) पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश तांबे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला .

यावेळी सदाशिव खाडे, नगरसेवक संतोष कांबळे, शारदा सोनवणे, अंबरनाथ कांबळे, शशिकांत कदम, हर्षल ढोरे, उषाताई मुंढे, सागर अंगोळकर, राजेंद्र राजापुरे, महेश जगताप, विलासतात्या जगताप, सुषमाताई गावडे, संजय जगताप, सुरेखा साळुंखे, सुरेशदादा तावरे, सुभाष पवार, मिलिंद कंक, सूर्यकांत गोफणे, गणेश बनकर, श्रीनिवास बढे, संजय यादव, राजू नागणे, संतोष बागडी, जवाहर ढोरे, अभिमन्यू गाडेकर, शशिकांत दुधारे, राहुल जवळकर, मारुती तरटे, संतोष ढोरे, सुरेश शिंदे, अतुल पवार, विक्रम भेगडे, शिवाजी निम्हण, ललित म्हसेकर, मरकड सर, पत्रकार संतोष महामुनी, स्थानिक पदाधिकारी आणि पिंपरी चिंचवड शहरातील असंख्य क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.

Google Ad

यावेळी महापौर माई ढोरे पोलिस अधिकारी तसेच नगरसेवकांना  क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनीही एकमेकांच्या दांड्या उडवत खेळाचा आनंद लुटला.

सकाळी १०.०० वा. पी डब्लू डी मैदान नवी सांगवी येथे या स्पर्धेला भक्ती शक्ती फास्टर आणि नेहरु नगर क्रिकेट संघात पहिल्या समन्याची सुरुवात झाली. यात भक्ती शक्ती फास्टर हा संघ विजयी ठरला. आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, यावर्षीही दि. ३० डिसेंबर ते १० जानेवारी २०२२ या कालावधीत शहरातील नामांकित क्रिकेट संघांना आमंत्रित करण्यात आले आहे. प्रत्येक संघास मयुरचे टी-शर्ट तसेच विजयी संघास रोख पारितोषिके आणि चषक व उत्तेजनार्थ वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. आमदार चषक स्पर्धा तीन प्रकारात घेण्यात येणार आहेत.

या क्रिकेट सामन्यास आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. आमदार चषक क्रिकेट सामन्याचे लाईव्ह थेट प्रेक्षपण http://Www.criclife.in  अजयदादा दुधभाते,दिपक मंडले सर,प्रदिप गुळमिरे सर्व टीम यांनी अगदी साजेसे असे केले आहे,त्यामुळे क्रिकेट प्रेमींनी घरात बसून खेळाचा आनंद घेतला. मा .नगरसेवक शंकरशेठ जगताप यांनीही उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घेतला. या आयोजनात अजय दुधभाते, निलेश जगताप तसेच मनीष कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे दिसून येत होते.

Live सामना पहा, आमदार ‘लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या उपस्थितीत :- https://youtu.be/t2jSLNSyhDI

आजची काही क्षणचित्रे :-

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!