Google Ad
Editor Choice Sports

पिंपरी चिंचवड महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या … शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत विद्या निकेतन इंग्लिश स्कूलच्या ओम सरोदे याला १७ वर्षांखालील वयोगटात विजेतेपद

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि १८ नोव्हेंबर) : पिंपरी चिंचवड महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत विद्या निकेतन इंग्लिश स्कूलच्या ओम सरोदे याने १७ वर्षांखालील वयोगटात विजेतेपद पटकावले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा 2022-23 चे आयोजन हेडगेवार क्रीडा संकुल, मासुळकर कॉलनी पिंपरी येथे करण्यात आले आहे.

सदर स्पर्धा 14, 17, 19 वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात होणार असून 127 शाळांमधील एकूण 879 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. १४| ११ |२०२२ ते १९ | ११ | २०२२ च्या अखेर होणार आहे. या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुले वयोगटात एकूण २६८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धा स्विस लीग पद्धतीने एकूण 9 फेऱ्या खेळल्या गेल्या. या स्पर्धेतून 2022-2023 च्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी 5 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

Google Ad

या स्पर्धेचे उद्घाटन प्रभारी क्रीडा अधिकारी सुभाष पवार यांच्या हस्ते करण्यात आले . स्पर्धा प्रमुख श्री गोरक्ष तिकोने , क्रीडा पर्यवेक्षक यांनी पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचा परिचय करून दिला. वाल्मिक पवार यांनी आभार मानले. सौ.सुलोचना चौधरी. श्री.प्रशांत उबाळे. श्री.अरविंद कोऱ्हाळे, श्री.दिलीप धनवटे. स्पर्धेच्या कामात श्री.संदीप विनोदे यांनी सहकार्य केले. पंचप्रमुख श्री विवेक भागवत आणि श्री.विकास देशपांडे. श्री सदाशिव गोडसे, श्री शुभम चतुर्वेदी, सौ मनीषा भागवत, श्री गुरुजित सिंग, श्री उमेश खेंगरे, श्री.मधुकर पंदारे, श्री जितेंद्र वाळिंबे , श्री.सुधाकर बाविस्कर, सौ. प्राजक्ता थोरात यांनी पंच म्हणून काम पाहिले.

प्रथम पाच क्रमांकाची पुढील विभागीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे

१७ वर्षाखालील मुलांचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे आहे
१) प्रथम क्रमांक :- ओम संतोष सरोदे
(९ गुण) – विद्या निकेतन इंग्रजी
2)द्वितीय क्रमांक: -रोहित श्रीराम (८गुण) – रॉयल वर्ल्ड स्कूल
३) तृतीय क्रमांक :- यशवर्धन आकाश अग्रवाल (७.५ गुण) -विस्डम वर्ल्ड स्कूल
4) पार्थ अतुल पाटील (७.५ गुण)- ब्लॉसम पब्लिक स्कूल
५) आदित्य भोसले (७.५ गुण)- पोदार इंटरनॅशनल पिंपरी

९ व्या फेरीतील महत्वपूर्ण १० डावांचे निकाल पुढीलप्रमाणे :- 
१. ओम संतोष सरोदे (१४०८) ८ गुण विजयी विरुद्ध . श्रीखंडे मिहीर राहुल(१३६८) ७गुण
2 आदित्य भोसले (१३३५) ७ गुण बरोबरी विरुद्ध यशवर्धन आकाश अग्रवाल (१०३२) ७गुण
३ उत्कर्ष मंदार कुलकर्णी ७ गुण पराभूत विरुद्ध रोहित श्रीराम ७ गुण
4 पार्थ अतुल पाटील (११५७) ६.५ गुण विजयी विरुद्ध . ओरको रॉयचौधरी ६.५गुण
5 आयुष चौधरी ६.५ गुण बरोबरी विरुद्ध वेद अनिल बोरोले ६.५गुण
6 धवल गुंजन सिन्हा ६.५गुण पराभूत विरुद्ध शालिन नवीन जावरिया ६.५गुण
7 आर्य अनिल पाटील(१३४२) ६ गुण विजयी विरुद्ध . तेजस रवींद्र पाटील ६.५गुण
8 अभिषेक पिल्लई ६ गुण पराभूत विरुद्ध पार्थ विक्रांत भांगे ६ गुण
9 ओंकार अजित कानडे ६ गुण बरोबरी विरुद्ध आमोद अमित औटी ६ गुण
10 पार्श्व नितीन ताथेड ६ गुण विजयी विरुद्ध . अनिरुद्ध संतोषकुमार नायर ६ गुण

 

१४ वर्षा खालील मुलांचा अंतिम निकाल खालील प्रमाणे :-
१) प्रथम क्रमांक:- Lalitaditaayyanar Bhoominathan
(८.५ गुण) – इन्केट जिसस हायस्कूल वाकड
2)द्वितीय क्रमांक: -संभव राहुल भटेवरा (८ गुण) – पोदार इंटरमैशनल स्कूल चिंचवड
3) तृतीय क्रमीक :- यश विनोद वाणी (७.५ गुण) -जयहिंद हायस्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज पिंपरी
४)अनिरुद्ध त्रिविक्रम बालिंगा (७.५ गुण) – सीटी प्राईड स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज निगडी
५) अर्णव सूर्यकांत लांडगे (७.५ गुण) – अक्षरा इंटरनॅशनल स्कूल, वाकड

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement