Google Ad
Editor Choice Sports

पुण्याचा पठ्ठ्या अभिजीत कटके ‘हिंद केसरी’; पटकावली मानाची गदा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .०८ जानेवारी) : तेलंगणामधील हिंद केसरी स्पर्धेतील फायनलमध्ये कुस्तीपटू अभिजीत कटके याने हरियाणाचा पैलवान सोमवीर याचा पराभव केला आहे. अभिजीत कटके विजयानंतर पुण्यात एकच जल्लोष पहायला मिळत आहे. अभिजीतने सामन्यात सोमवीरला एकही संधी दिली नाही आणि सामना 4-0 ने जिंकला आहे. 

Google Ad

भारतीय कुस्तीतील सर्वात मानाची स्पर्धा म्हणजे हिंद केसरी. या हिंद केसरी सामन्याचा अंतिम सामना रविवारी खेळला गेला. अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या अभिजीत कटके (Abhijit Katke) याने हरियाणाच्या सोमवीरला (somveer) टिकू दिलं नाही. हरियाणाच्या सोमवीर याला 4-0 अशा फरकाने लोळवत खिताबावर नाव कोरलं आहे.

अभिजीत दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी तर एकवेळा महाराष्ट्र केसरी राहिला आहे. हिंद केसरीची गदा महाराष्ट्राकडे जाते की हरियाणाकडे अशी उत्सुकता सर्वांना लागली होती. मात्र, अभिजीतने धोबीपछाड देत महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. 2017 मध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर अभिजित कटके याने महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला होता.

दरम्यान, अखिल भारतीय ॲमॅच्युअर रेसलिंग फेडरेशनतर्फे हिंद केसरी हा किताब देण्यात येतो. हा किताब या फेडरेशन तर्फे आयोजित कुस्ती स्पर्धेत अजिंक्यपद मिळवणाऱ्या विजेत्यास दिल्या जातो. याआधी 2013 साली पुण्याच्या अमोल बराटेने (Amol Barate) हा किताब पटकावला होता. त्यानंतर आता अभिजीत कटके याने पुण्याचा अभिमान आणखीन उंचावल्याचं पहायला मिळतंय.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!