Google Ad
Editor Choice Sports

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते शहरातील खेळाडूंचा सत्कार

 महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२४  डिसेंबर २०२१  :- पिंपरी चिंचवड शहरातील कराटेपटू खेनन पाटील, कुस्तीपटू प्रगती गायकवाड, स्केटिंग खेळाडू आकांक्षा धनावडे आणि डायडेम मिस इंडिया झालेली पुनम महाराणा यांचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर उषा उर्फ माई ढोरे  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमप्रसंगी  आयुक्त राजेश पाटील यांच्यासह उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुलेस्थायी समिती सभापती अँड.  नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके क्रीड़ा कला साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळेशिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्य राजेंद्र गावडे, नगरसदस्या अपर्णा डोके, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, विकास ढाकणे,  उल्हास जगताप, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड आदीसह सत्कारार्थींचे  पालक  उपस्थित होते.

Google Ad

       रांची झारखंड येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये ५४ किलो वजनी गटात भारतात प्रथम  आलेल्या प्रगती गायकवाड हिने सुवर्ण पदक पटकाविले आहे. तर राष्ट्रीय स्केटींग स्पर्धेत आकांक्षा धनावडे हिने राष्ट्रीय पातळीवर  सुवर्ण पदक मिळवले आहे. तसेच कराटे कुडो स्पर्धेमध्ये खेनन पाटील हिने राज्य पातळीवर सुवर्णपदक तर राष्ट्रीय पातळीवर रौप्य पदक मिळवले आहे.  दिल्ली येथे किंगडम ऑफ ड्रिम्स या डायडेमने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पुनम महाराणा हीने डायडेम मिस इंडिया २०२१ हा किताब पटकावला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!