Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

खंडित वीजपुरावठ्यामुळे प्रभाग क्र.१७ मधील त्रस्त नागरिकांना ‘नगरसेविका करुणा चिंचवडे’ यांच्या पाठपुरवठ्यामुळे मिळणार दिलासा!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मधील कार्यक्षेत्रात चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, शिवनगरी, बळवंतनगरी, सुखनगरी बीजलीनगर या भागात खंडित वीजपुरवठा, मोडकळीस आलेले डी पी बॉक्स, कमकुवत वीजपुरवठा करणाऱ्या व वारंवार शॉर्ट होणाऱ्या वायर बदलाव्या यासाठी नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्याकडून पिंपरी डिव्हिजन चे शिवाजी वायफळकर, चिंचवड सब वे अशोक जाधव, बिजली नगर उपकेंद्रचे जाधव यांच्या कडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे.

येत्या काळात या परिसरातील विजेचा लोड वाढला असून उच्च वीज वहन क्षमता असलेले ट्रान्सफॉर्मर बसवावेत तसेच धोकादायक असलेले ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करावेत यासाठी पाठीमागील बऱ्याच दिवसापासून सलग तिसऱ्यांदा नगरसेविका करुणा चिंचवडे यांनी पत्रव्यवहार केला, यासाठी प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य शासन यांचेकडे संबधित परवानग्या साठीही पाठपुरावा केला, मात्र आज सकाळी थेट बिजली नगर येथील कार्यालयात धडक मारून अधिकाऱयांना सोबत घेऊन प्रत्येक कॉलनीत जाऊन पाहणी करत करुणा चिंचवडे यांनी परिस्थितीची प्रत्यक्ष जाणीव करून दिली.

Google Ad

गेल्या आठवड्यात बळवंत नगरी येथे साई माऊली कॉलनी, स्वराज्य कॉलनी व इतर कॉलनी मध्ये वायर शॉर्ट झाल्याने वीजपुरवठा तीन दिवस खंडित होता या कॉलनी साठी केबल आणि एल टी डी पी बॉक्स मंजूर करून दुरुस्ती सह वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला
याच पार्श्वभूमीवर आज सकाळी चिंतामणी कॉलनी ब, सिद्धिविनायक कॉलनी, नंदनवन कॉलनी, शिवतेज व मोरेश्वर कॉलनी, साईराम कॉलनी, शिवप्रसाद कॉलनी, स्वप्नशिल्प कॉलनी

येथील केबलचे टेस्टिंग करून कमकुवत झालेल्या केबल बदलण्यासाठी आज सकाळी mseb च्या अधिकारी व ठेकेदारांसह पाहणी केली, कॉलनीतील अंतर मोजून लागणारी केबल मंजूर करून घेण्यात आली, लवकरच सदैव अंधारात आणि खंडित वीज पुरवठ्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू होणार आहे,अशी माहिती शेखर चिंचवडे यांनी दिली, त्यामुळे बऱ्याच दिवसांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याचे नागरिकांनी सांगितले.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!