Google Ad
Editor Choice Pune

बापच निघाला अपहरण कर्ता …०३ वर्षीय बालकाच्या अपहरणाचा गुन्हे शाखा युनिट -४ , पिंपरी चिंचवड कडुन अवघ्या १२ तासात गुन्हयाचा छडा!

महाराष्ट्र 14 नीज : शोभा रामदास डोळस , वय- ४० जीवन नगर , ताथवडे , पुणे यांनी वाकड पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारी नुसार, त्यांचा नातु विरेंद्र महावीर साळवी , वय -०३ वर्षे हा दि . ०६/१०/२०२० रोजी सायंकाळी ५ :३० वा . सुमारास त्यांचे राहते घरासमोर खेळत असताना दुचाकी वरुन आलेल्या एका अनोळखी इसमाने त्यास जबरदस्तीने पळवुन नेले . अशी तक्रार दिल्याने वाकड पोलीस ठाणे येथे दिली त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता .

सदर बालकाचे अपहरणाचा प्रकार हा गंभीर स्वरुपाचा असल्याने मा . पोलीस उप – आयुक्त ( गुन्हे ) सुधिर हिरेमठ सो , यांनी गुन्हे शाखेस तातडीने तपास करण्या बाबत आदेश दिले होते . त्या अनुशंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे , गुन्हे शाखा युनिट -४ , यांनी सदर प्रकरणाचा समांतर तपास सुरु करुन सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख , पोहवा प्रविण दळे , पोना तुषार शेटे , पोना मोहम्मद गौस नदाफ , पोना लक्ष्मण आढारी , पोशि प्रशांत सैद यांचे पथक तयार केले .

Google Ad

सदर पथकाने तात्काळ गुन्हयाचे सखोल तांत्रिक विश्लेषण केले असता सदर बालकाचे अपहरण हे मितेश भगत नावाच्या इसमाने केले असण्याची शक्यता असल्याचे आढळुन आले . तेव्हा बातमीदारांना सतर्क करुन तांत्रिक तपास केला असता भगत हा केईम हॉस्पिटल , रास्ता पेठ , पुणे येथे लपुन बसला असल्याची माहिती मिळाल्याने सदर पथकाने त्यास सापळा रचुन शिताफीने ताब्यात घेवुन त्याचे कडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव मितेश उर्फ मितवा मारुती भगत , वय -२५ वर्षे , धंदा- ड्रायव्हर , रा- मु.पो.मळोली , ता – माळशिरस , जि – सोलापुर

असे असल्याचे सांगुन त्याचा गावाकडील मित्र व सदर बालकाचा वडील महावीर किंचिंक साळवे , रा- मु.पो.मळोली , ता – माळशिरस , जि – सोलापुर याचे सांगणे वरुन त्याचे सह सदर बालकाचे अपहरण केले असल्याचे व सद्या सदर बालक हा त्याचे सह असल्याचे सांगितले . तेव्हा महावीर साळवे याचे बाबत सखोल तपास केला असता, तो उरुळीकांचन येथे बस डेपोचे मागील परिसरात एका नातेवाईकाकडे लपुन बसला असल्याची माहिती मिळाली .

तेव्हा सदर पथकाने तसेच रात्रीतुन सदर ठिकाणी जावुन संपुर्ण परिसराची छाणनी केली असता तो एका नातेवाईकाच्या घराच्या टेरसवर त्या बालकासह झोपलेल्या अवस्थेत आढळून आला . त्यास दि . ०७ ऑक्टोबर २०२० रोजी पहाटे ०४:०० वा . ताब्यात घेण्यात आले . आरोपी महावीर किंचिंक साळवे , रा- मु.पो.मळोली , ता – माळशिरस , जि – सोलापुर याचे कडे चौकशी करता त्याची पत्नी त्याचेसह नांदत नसल्याचे कारणावरुन त्याने वरील मित्राचे मदतीने आपल्याच मुलाचे विरेंद्र याचे अपहरण केले असल्याचे सांगितले आहे .

सदर दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी वाकड पोलीस ठाणे यांनी ताब्यात घेतले असुन त्या बालकास त्याचे आईच्या ताब्यात देण्यात आले आहे . पुढील तपास वाकड पोलीस ठाणे करत आहे . सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , पोलीस उप आयुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहा . पोलीस आयुक्त राजाराम पाटील गुन्हे यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा , युनिट -४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे , सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख , पोहवा / प्रविण दळे , नारायण जाधव , संजय गवारे , धर्मराज आवटे , दादाभाऊ पवार , अदिनाथ मिसाळ पोना / संतोष असवले , तुषार शेटे , लक्ष्मण आढारी , मो , गौस नदाफ , वासुदेव मुंडे पोशि / शावरसिध्द पांढरे , प्रशांत सैद , सुनिल गुहे , तुषार काळे , सुरेश जायभाये , अजिनाथ ओंबासे , धनाजी शिंदे , सुखदेव गावंडे , गोंविद चव्हाण , नागेश माळी , राजेंद्र शेटे तांत्रिक विश्लेषन विभाग गुन्हे शाखा युनिट -४ , पिंपरी चिंचवड व वाकड पोलीस ठाणे चे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!