Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

Beed : २६ वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल , फायनान्सच्या कार्यालयात घेतला गळफास!

महाराष्ट्र 14 न्यूज : तरुणाने स्वतःच्या फायनान्सच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात ही घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. योगेश इंद्रजीत गणगे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आंबेजोगाई पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथील तरुणाने स्वतःच्या फायनान्सच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली. इंद्रजीत गंगणे ( वय 26 , रा . राडी ) असे त्या तरुणाचे नाव आहे . गावातील जिल्हा परिषद शाळेच्या जवळ योगेशचे स्वतःचे फायनान्स आहे . सोमवारी रात्रीतून कधीतरी त्याने फायनान्सच्या कार्यालयात पत्र्याच्या लोखंडी आडूला नायलोनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर मंगळवारी ही घटना उघडकीस आली.

Google Ad

घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. दरम्यान , योगेशने कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही . योगेशचे चुलते शिवाजी रामचंद्र गंगणे यांच्या जबाबावरून अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

127 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!