Google Ad
Editor Choice

सांगवी-पिंपळे गुरव भागात हातात कोयता घेऊन रात्रीची दहशत … दोघांना अटक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि०८ मे) : पिंपरी चिंचवड शहरात नुकतेच नविन पोलीस आयुक्त आले आहेत. दिवसेंदिवस शहरातील गुन्हेगारी बळावत चालली आहे. गुन्हेगारांना कोणाचाही धाक राहिला नाही.

०७/०५/२०२२ रोजी सुहास बबन डंगारे , पोलीस अंमलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री १२.४५ वा . सृष्टी चौक , पिंपळे गुरव पुणे येथे सार्वजनिक रोडवर आरोपी केविन प्रकाश ब्राम्हणे , वय २२ वर्षे , धंदा – नोकरी , रा . फ्लॅट , नं . २००१ मित पॅराडाईज मदिना मस्जिद मागे , पिंपळे गुरव पुणे हा कोणतेही शस्त्र जवळ बाळगण्यास बंदी असताना सदर आदेशाचा भंग करुन आपले कब्जात लोखंडी कोयता घातक शस्त्र बाळगले असताना आढळून आला असता त्यास पोलिसांनी अटक केली आहे.

Google Ad

याच दिवशी (०७ मे) पोलीस हवालदार विवेक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री ०२.३० वा . वसंतदादा पुतळा, जुनी सांगवी पुणे या ठिकाणी आरोपी हजरत इस्माईक अब्दुल रफीक शेख , वय २४ वर्षे , धंदा- मजुरी , रा . मुळानगर , जुनी सांगवी पुणे हा लोखंडी कोयता असे घातक शस्त्र बाळगले असताना आढळुन आला, असता पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ०३ मे ते १६ मे या कालावधीमध्ये घातक शस्त्र बाळगणे मनाई आदेश आहे. या आदेशाचे उल्लंघन करून आरोपी हे कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे कोयता सापडला. पोलीस उपनिरीक्षक वरुडे आणि सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!