Google Ad
Editor Choice Maharashtra

मुख्यमंत्र्यांकडून भाविकांना दिवाळी भेट … पहा केव्हा पासून? राज्यातील मंदिरे , धार्मिकस्थळे उघडणार!

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच सोमवारपासून उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा,असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Google Ad

बहुतेक सर्वच बाबी अनलॉकमध्ये सुरु झाल्याने सातत्याने राज्यातील मंदिरंही खुली करावीत अशी मागणी होत होती. अखेर ठाकरे सरकारने याची दखल घेत दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय घेतला आहे.
दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले असून प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी कोरोनारूपी नरकासुराने वर्षभर घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही

हळूहळू हा राक्षसही थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. या काळात राज्यातील जनतेने शिस्तीचे पालन केल्यामुळेच महाराष्ट्राची स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत हाताबाहेर गेली नाही. साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच महाराष्ट्रावर कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. एवढेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच.

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णायामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असून भाविकांसाठी ही एक दिवाळी भेटच ठरली आहे

हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रींची इच्छा
या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने ‘देव’ पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा.

हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील!

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!