Google Ad
Editor Choice Maharashtra

पिंपरी चिंचवडसह सांगवीच्या सोन्याच्या बाजारपेठेला झळाळी … सराफ बाजारात ग्राहकांच्या उत्साहाला गर्दीचे स्वरूप!

Google Ad

महाराष्ट्र 14 न्यूज : धनत्रयोदशीच्या निमित्तानं सोने बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. बाजारात नवचैतन्य संचारलं असून, धनत्रयोदशीचा दिवस सोने खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. धनत्रयोदशी हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे. आजच्या दिवशी महिलावर्ग मोठ्या प्रमाणात सोनं आणि चांदी खरेदी करतात. पिंपरी चिंचवड शहरातील सांगवीतही सोनं, चांदी खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. कोरोना काळात दिवाळी आल्यामुळे काही प्रमाणात दिवाळीचा उत्साह कमी पाहायला मिळतोय असे वाटले होते पण बाजारात फेरफटका मारल्यावर सांगवीच्या सराफ बाजारात कावेडीया ज्वेलर्स आणि सोलंकी ज्वेलर्स मध्ये ग्राहकांनी सोने खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले.

मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी 40 टक्के दर वाढले आहेत. आजच्या दिवशी चांदीचे दागिने, भांडी खरेदी केली जातात. विशेष म्हणजे धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी गुरुवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. यामुळे दिवाळीच्या काळात सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला होता. काल सोन्याच्या दरात तब्बल दोन हजार रुपयांनी घसरण झाली होती. सोने आणि चांदीच्या भावात पहिल्यांदाच दिवाळीच्या काळात धनत्रयोदशी तसेच लक्ष्मीपूजनाच्या तोंडावर घसरले होते. इतर वेळी याच काळात सोने व चांदीचे दर वाढत असल्याचा पूर्वानुभव आहे. काल दोन हजारांनी सोनं कमी झाल्याने गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे.

सोन्याचा भाव माहीत असूद्या.
जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदीसाठी मार्केटमध्ये जात असाल तर सगळ्यात आधी चालू दिवसाचे सोन्या-चांदीचे भाव माहिती असू द्या. यासाठी तुम्ही इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन वेबसाइट https://ibjarates.com/ वर भेट देऊ शकता. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणाचे भाव शोधायचे आहेत तर त्यासाठी तुम्हाला या वेबसाइटची मदत होईल. खरं सोनं हे 24 कॅरेटचंच असतं. दागिन्यांसाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो, ज्यामध्ये 91.66 टक्के सोनं शुद्ध असतं.

दागिने खरेदी करताना हॉलमार्कची खातरजमा करा
तुम्ही दागिने विकत घेण्यासाठी गेला असाल तर हॉलमार्कसह दागिने घेतले आहेत ना, याची खात्री करा. कारण सोनं विकताना, हॉलमार्क असलेल्या दागिन्यांची किंमत सध्याच्या बाजारभावावर निश्चित केली जाते. म्हणून हॉलमार्कसह दागिने खरेदी करा.

सांगवीच्या कावेडीया ज्वेलर्स ने सोने खरेदी च्या मजुरीवर बंपर डिस्काउंट दिल्याने ग्राहक आनंदात होते, तर सोलंकी ज्वेलर्स यांनीही सोने खरेदीवर १० ते ५० % डिस्काउंट ची ऑफर ठेवली आहे. त्यामुळे सांगवीच्या सराफ बाजारात ग्राहकांचा सोने खरेदीसाठी प्रचंड उत्साह दिसत होता.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

65 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!