Google Ad
Education

पिंपळे गुरवमध्ये शिव – भिम गीतांची रंगली सुरेल मैफिल … कडूबाई खरात यांचे गायन शाहीर सीमा पाटील यांच्या पोवाड्याला रसिकांनी दिली दाद!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ नोव्हेंबर) : पिंपरी चिंचवड मधील पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकातील काळूराम जगताप बॅडमिंटन हॉलशेजारील मैदानावर शिव – भीम गीतांचा सुरेल कार्यक्रम दीपावली निमित्ताने आयोजित केला होता . या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक अंबरनाथ कांबळे मित्रपरिवार यांच्याकडून केले होते .

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात आली . शाहीर सीमा पाटील यांनी महाराष्ट्र भूमी ही बहुगुणी इतिहास महाराष्ट्राचा ” रांगडा बान्या अशा आवाजात बहारदार पोवाडा सादर केला .

Google Ad

कडूबाई खरात यांचे बहारदार गायन ‘तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबा साहेबांची सही हाय रं’ … हे जगप्रसिद्ध गाजलेले गीत प्रबोधनकार कडूबाई खरात यांनी गायले . भीम शाहीर राहुल शिंदे यांनी बाबासाहेबांचे गौरव गीत गायले . एकाहून एक गीत सादर होत असताना रसिक या गाण्याचा आनंद घेत होते . कार्यक्रमाच्या शेवट ” ओ शेठ “ या महाराष्ट्रभर गाजलेल्या गाण्याचे मूळ गायक उमेश गवळी यांनी ” ओ शेठ ” हे गीत गायले .

याप्रसंगी महापौर उषा ढोरे , मा.नगरसेवक शंकरशेठ जगताप, नगरसेविका उषा मुंढे , नगरसेवक अंबरनाथ कांबळे , सागर अंघोळकर , शशिकांत कदम , संतोष कांबळे , स्वीकृत नगरसेवक महेश जगताप , माजी स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापुरे , माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे , माउली जगताप , संतोष ढोरे , साई कोंढरे , जवाहर ढोरे आदी उपस्थित होते .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

272 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!