Google Ad
Education

नगरसेविका सौ करुणा शेखर चिंचवडे व शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन च्या वतीने आयोजित केलेल्या … मोरया दीपावली फेस्टिवल चा समारोप मोठ्या उत्साहात संपन्न !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ नोव्हेंबर) : पिंपरी चिंचवड मनपाच्या नगरसेविका सौ करुणा शेखर चिंचवडे व शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन च्या वतीने आयोजित केलेल्या मोरया दीपावली फेस्टिवल चा समारोप मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

नगरसेविका सौ करुणा शेखर चिंचवडे व श्री शेखर बबनराव चिंचवडे यांच्या वतीने आयोजित केलेल्या मोरया फेस्टिवल मध्ये अमृतमहोत्सवी ७५ वर्षे देशसेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या सैनिकांचा, विरपत्नी, वीर माता यांचा सन्मान, प्रभागातील 60 महिला बचत गटांना मोफत विक्री स्टॉल, लहान मुलांसाठी फन फेयर, महाराष्ट्र राज्य मर्दानी खेळ असोसिएशनचे लहान मुलांचे मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, लहान मुलांसाठी खास आकर्षण जादूगार प्रकाश यांचे जादूचे खेळ, दिव्यांग (अंध) बांधवांचा सदाबहार गीतांचा कार्यक्रम, प्रभागातील रिक्षा चालक व स्कुल बसचालक यांना मोफत गणवेश वाटप, प्रभागातील महिला बचतगटांच्या महिला भगिनींचा सन्मान अश्या विविध कार्यक्रमांनी मोरया फेस्टिवल मध्ये रंगत आणली.

Google Ad

वाल्हेकरवाडी चिंतामणी चौक येथे दिनांक 23/10/2021 ते 8/11/2021 या काळात भरविण्यात आलेल्या मोरया दीपावली फेस्टिवल २०२१ चे उदघाटन पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर सौ उषा उर्फ माई ढोरे, कार्यसम्राट आमदार श्री लक्ष्मण भाऊ जगताप यांचे कनिष्ठ बंधू श्री.शंकर शेठ जगताप यांच्या हस्ते झाले,यावेळी प्रभागातील मान्यवर उपस्थित होते.

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात योगदान दिलेल्या माजी सैनिक, वीरमाता, वीर पत्नी यांचे योगदान लक्षात घेता आज आझादी ला 75 वर्षे पूर्ण होत असताना त्यांचा सन्मान करणे क्रमप्राप्त आहे म्हणूनच त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी सैनिक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असे शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री शेखर बबनराव चिंचवडे यांनी सांगितले.

प्रभागातील महिला भगिनींनी उद्योजकतेकडे वळावे सोबत कोरोना काळात लहान मुलांना फन फेयरच्या माध्यमातुन निराशाजनक वातावरणातून बाहेर पडावे यासाठी भव्य प्रदर्शन व विक्री फेस्टिवल, फन फेयरचे आयोजन करण्यात आले होते असे मत नगरसेविका सौ करुणा शेखर चिंचवडे यांनी व्यक्त केले.
प्रभागातील बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतलेल्या मोरया फेस्टिवल चा समारोप आज उत्साहात पार पडला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!