Google Ad
Editor Choice Maharashtra

Supe : अहमदनगर ला जायचंय … या ठिकाणी सुरू झालाय जिल्ह्यातील पहिला सीएनजी पंप!

महाराष्ट्र 14 न्यूज : नगर-पुणे मार्गावरील सुपे औद्योगिक वसाहतीत म्हसणेफाटा येथील जिल्ह्यातील पहिल्या सीएनजी पंपाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते झाले. सुपे औद्योगिक वसाहतीबरोबरच पारनेर शहराला पाइपलाइनद्वारे गॅसचा पुरवठा करावा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी भारत पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांना केली. उद्योजक कैलास गाडीलकर यांचा हा पंप आहे.

डिझेल डोअर डिलिव्हरी सेवेचाही यावेळी प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, भारत पेट्रोलियमचे जनरल मॅनेजर आदित्यकुमार, डीजीएम रंगनाथन, टेरिटरी मॅनेजर दिनेश गाडगीळ उपस्थित होते. यावेळी बोलताना आ.लंके म्हणाले की, सीएनजी पंप सुरु करण्याचा पहिला मान पारनेर तालुक्याला मिळाला त्याबद्दल मी भारत पेट्रोलियमसह प्रशासनाचे आभार मानतो. पेट्रोल पंपाच्या माध्यमातून श्री स्वामी मल्टिसर्व्हिसेसने सामाजिक बांधिलकी जपली असून, अपंग गरजू विद्यार्थ्यांच्या विविध गरजा ते पूर्ण करत असल्याचे म्हटले.

Google Ad

भारत पेट्रोलियमच्या सीएनजी इंधनचा पहिला पंप नगर जिल्ह्यात सुरु झाला आहे. पुढील ४ महिन्यात जिल्ह्यात सीएनजीचे आणखी १६ पंप सुरु होणार आहेत. सीएनजी इंधन हे पर्यावरणाच्या दृष्टिने अत्यंत फायदेशीर आहे. वजनाने अत्यंत हलके असणाऱ्या या इंधनाने पर्यावरणाचे कोणतेही नुकसान होत नाही. प्रदूषण होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला ते धोका पोहोचवत नाही. डिझेल-पेट्रोलवरील वाहनांच्या अँव्हरेजपेक्षा सीएनजीचे अँव्हरेज जास्त असून त्याची किंमतही कमी आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!