Google Ad
Editor Choice india

Delhi : सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका … 3 महिन्यात 200 रुपयांनी महागला गॅस सिलेंडर

महाराष्ट्र 14 न्यूज : सामान्यांना महागाईमुळे या महिन्यात आणखी एक फटका सहन करावा लागणार आहे. कारण पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्याने (LPG Gas Cylinder Price Hike) सामान्यांचे एकंदरित महिन्याचे बजेट कोलमडले आहे. तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली आहे. यानंतर सबसिडी नसणाऱ्या 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची दिल्लीतील किंमत 794 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे.

हे नवीन दर 25 फेब्रुवारीपासून अर्थात आजपासून लागू होत आहेत. फेब्रुवारी महिन्यात तीन वेळा एलपीजी गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत. त्यामुळे पुढील महिन्यात सामान्यांना आणखी फटका सहन करावा लागणार का याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Google Ad

डिसेंबरपासून 200 रुपयांनी वधारला एलपीजी गॅस

1 डिसेंबरपासून आतापर्यंत एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सामान्यांच्या बजेटवर नक्कीच परिणाम होत आहे. दर 594 रुपयांवरून आज 794 रुपये प्रति सिलेंडर झाले आहेत.

कसे वाढले दर?
-1 डिसेंबर रोजी दर 594 रुपयांवरून 644 रुपये प्रति सिलेंडर झाले
-1 जानेवारी रोजी दर 644 रुपयांवरून 694 रुपये प्रति सिलेंडर झाले
-4 फेब्रुवारी रोजी दर 694 रुपयांवरून 719 रुपये प्रति सिलेंडर झाले
-15 फेब्रुवारी रोजी दर 719 रुपयांवरून 769 रुपये प्रति सिलेंडर झाले
-25 फेब्रुवारी रोजी दर 769 रुपयांवरून 794 रुपये प्रति सिलेंडर झाले

Google Ad

About the author

Maharashtra14 News

66 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!