Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

शिवसेनेच्या महिला संघटिका ‘मंदा फड’ यांच्या प्रयत्नांना यश … महापालिकेकडून महिला बचत गटांच्या खात्यात रक्कम जमा!

महाराष्ट्र 14 न्यूज : दिनांक ४ ऑगस्ट रोजी मंदा फड यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदना मुळे महापालिके कडून दिनांक २० ऑगस्ट रोजी शालेय पोषण आहारात काम करणाऱ्या महिला बचत गटांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने पैसे जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील शालेय पोषण आहारात काम केलेल्या महिला बचत गटातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तसेच सर्वांनी याबाबत शिवसेना विभाग संघटिका मंदा फड यांचे आभार मानले.

सामाजिक कार्यात सक्रीय असलेल्या मंदा फड यांनी शालेय शिक्षण विभाग पिंपरी चिंचवड महानगर पालिका यांनी दोन वर्षांपासून शालेय पोषण आहार मध्ये काम करणाऱ्या बचत गटांचे स्वयंपाकी व मदतनीस याचे मानधनाचे पैसे शिक्षण विभागाकडे जमा झालेले असूनही अजुन दिलेले नाहीत.शालेय शिक्षण विभागाच्या खात्यामध्ये ते पैसे पडून असून ते पैसे देण्याची तजवीज शिक्षण विभाग का करत नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. एप्रिल २०१८ पासून फरकाची रक्कम भेटणार होती, पण ती रक्कम ही शिक्षण विभागाने राज्य शासनाकडे व्यवस्थित पाठपुरावा न केल्यामुळे अडकून पडली आहे.

Google Ad

लॉक डाऊन मुळे बचत गटातील महिलांचे कंबरडे मोडले असताना बचत गट आपले हक्काचे पैसे कधी येतील , असे निवेदन पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले होते. बचत गटांना त्यांचे पैसे लवकरात लवकर देण्यात यावेत अन्यथा सर्व महिला बचत गटांचे प्रतिनिधी महापालिकेवर शिवसेना पद्धतीने मोर्चा काढून मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या विभाग संघटिका श्रीमती मंदा फड यांनी दिला होता, त्यांच्या या लढ्याला यश आले.

याबाबत मंदा फड यांच्याशी संपर्क केला असता हि लढाई अजून पूर्ण पणे संपलेली नाही, “जो पर्यंत महिला बचत गटांचा एक ना एक रुपया प्रशासनाकडून त्यांना मिळवून दिल्या शिवाय शिवसेना महिला आघाडी व मी शांत राहणार नाही” असे त्यांनी सांगितले. तसेच महापालिकेने रक्कम जमा केल्या बद्दल यात काम करणाऱ्या व मदत केलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. त्याच बरोबर अजुन ही बचत गटांची जी काही रक्कम अजुन भेटलेली नाही, ती रक्कम मिळवून देण्यासाठी प्रशासनाने आमच्यासोबत एकत्र येऊन पाठपुरावा करण्यासाठी मदत करावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!