Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

नवी सांगवीत रक्तदान शिबिरास तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद … प्रजासत्ताकदिनी ‘शिवरत्न शंभूराजे वेल्फेअर संस्थे’चा स्तुत्य उपक्रम!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी, छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील शिवरत्न शंभूराजे वेल्फेअर संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिन व संस्थेच्या 5 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास परिसरातील रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या शिबिरात तब्बल 197 जणांनी रक्तदान केले. शहरातील कोविड-19 रुग्ण व इतर रुग्णांसाठी रक्ताची कमतरता पडु नये या उद्देशाने संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सभासदांनी एकत्रित येऊन हा समाजोपयोगी स्तुत्य उपक्रम राबविला.

या उपक्रमाप्रसंगी महापौर माई ढोरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस निरीक्षक(गुन्हे) अजय भोसले, ह प्रभाग अध्यक्ष हर्षल ढोरे,नगरसेवक राहुल कलाटे, नगरसेविका शारदा सोनवणे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे,अतुल शितोळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, रावसाहेब चौगुले आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Google Ad

कोरोना कालावधीमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या शासकीय अधिकारी यांनाही संस्थेतर्फे यावेळी निमंत्रित केले होते. महापालिका आरोग्य विभागाच्या जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन तर महापालिका उपायुक्त संदीप खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. र.वि. तनपुरे (ह क्षेत्रीय कार्यालय पिं.चिं.मनपा) यांच्या हस्ते छत्रपती शंभूराजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रक्तदानास सुरुवात झाली.

पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांनीही यावेळी रक्तदान करून तरुणांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. महापौर माई ढोरे यांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. या रक्तदान शिबिरास ‘ओम’रक्तपेढीचे बहुमूल्य सहकार्य लाभले . संकलित करण्यात आलेले 197 पिशवी रक्त या रक्तपेढीकडे सुपूर्द करण्यात आले. आगामी काळातही संस्थेतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. रक्तदान शिबिरासाठी संस्थेचे पदाधिकारी निरज सांळूके,शुभम पाटील, प्रवीण जेधे,अमित शेलार,राजेंद्र कोकाटे,शंकर शितोळे,किरण लांडगे यांच्यासह सर्व सभासदांनी परिश्रम घेतले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!