महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शुक्रवार ( दि. २९, जानेवारी २०२१ ) रोजी महानगरपालिका रुग्णालयात १११ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील १०३ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील ०८ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ४४ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – पिंपरी (८० वर्षे) ०१ स्त्री – निगडी (७३ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा.
1 Comment