Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पुणे पदवीधर मतदानाला पिंपरी चिंचवड मधील पिंपळे गुरवमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी (आज) मंगळवार दि.1 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या दोन्ही मतदारसंघांतील अपक्षांसह सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. परंतु प्रचारा दरम्यान पक्षांच्या नेत्यांनी केलेली विधाने पाहता,मतदार कोणाला कशी पसंती क्रमांक देतील याचा निकाल ३ डिसेंबरला लागणार आहे.

Google Ad

पुणे पदवीधर मतदार संघासाठी प्रमुख पक्ष आणि अपक्षांसह एकुण 62 उमेदवार निवडून रिंगणात आहेत. तर शिक्षक मतदारसंघात प्रमुख पक्षांसह अपक्ष असे एकूण 52 शिक्षक उमेदवार असुन, या सर्वांनी मतदारांपर्यंत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पोहचुन मतदानासाठी गळ घालण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी कंबर कसली आहे.

पुणे पदवीधर निवडणुकीसाठी पहिल्या चार तासामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव मनपा शाळेत एकूण २४ टक्के मतदान झाल्याचे दिसून आले. आज मंगळवारी (ता.एक) सकाळी आठ वाजता मतदानाला सुरवात झाली आहे. सायंकाळी पाचवाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव मनपा शाळेत मतदारांनी मतदान केंद्रात गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!