Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स … शुक्रवार, ०४ जून २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि. ०४ जून २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शुक्रवार ( दि.०४ जून २०२१ ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील २६५ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १८९६ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. तर २७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला यातील १७ रुग्ण हे पिंपरी चिंचवड शहरातील तर १० रुग्ण हे पिं. चिं. मनपा हद्दीबाहेरील आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. कोरोना संसर्गाची दुसरी लाट मार्चपासून सुरू झाली होती. पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढला होता. दररोज कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय होती. पिंपरी चिंचवडची कोरोना रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनली होती. अशा परिस्थितीत महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात रुग्ण मोठ्या प्रमाणावर दाखल होऊन बरे झाले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता आटोक्यात आली आहे. अगदी मोजक्या संख्येने आता कोरोना रुग्ण मिळत आहेत. नागरिकही कोरोना नियमांचे पालन करत करीत आहेत.

Google Ad

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

71 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!