Google Ad
Editor Choice Maharashtra

Solapur : सोलापूर ब्रेकिंग – मोहोळजवळ केमिकल टॅंकर आणि कंटेनरचा भीषण अपघात … अपघातामुळे केमिकल टॅंकरने घेतला पेट!

महाराष्ट्र 14 न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळजवळ  केमिकल टॅंकर आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या भीषण घटनेमुळे महामार्गावरील दोन किलोमीटर अंतरावर वाहनं थांबवण्यात आली आहे. आज सकाळी मोहोळमधील पिंपरी इथं ही घटना घडली. भरधाव कंटेनर आणि केमिकल टँकरची समोरासमोर धडक झाली. धडक झाल्यानंतर केमिकलने भरलेला टँकर महामार्गावर उलटला. त्यामुळे काही क्षणात त्याने पेट घेतला. टँकरने भीषण भेट घेतल्यामुळे घटनास्थळी कंटेनरही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला आहे. त्यामुळे कंटेनरलाही आग लागली आहे.

आगीची तीव्रता इतकी भीषण आहे की, अपघातस्थळावरून दोन किलोमीटर दूर अंतरावर गाड्यांना थांबवण्यात आल्या आहे. आगीची दाहकता इतकी भीषण आहे की, 500 मीटरच्या परिसरात त्याची उष्णता जाणवत आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहे. खबरदारी म्हणून मार्गावरील वाहतूक ही पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.  अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल आहे. आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण येत आहे. महामार्गावरील वाहतूक ही वळवण्यात आली आहे.

Google Ad

या अपघात कंटेनर आणि टँकरमधील दोन्ही वाहनचालकांनी उड्या टाकून आपला जीव वाचवला. पण,  टँकर चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला  तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

81 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!