Google Ad
Editor Choice Front Maharashtra

सर्वप्रथम कोणी साजरे केले रक्षाबंधन? पुराण काळात ‘हे’ होते नाव!; वाचा

महाराष्ट्र 14 न्यूज : भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याची वीण म्हणजे रक्षाबंधन. चातुर्मासातील पहिला महिना म्हणजे श्रावण. हा महिना सुरू झाला की, वेध लागतात ते रक्षाबंधनाचे. रंगीबेरंगी राख्यांनी बाजार अगदी फुलून जातात. लहानपणापासून मोठे होईपर्यंत सोबत वाढलेले भाऊ-बहीण परिस्थितीनुरूप एकमेकांपासून दूर असले तरी, लहानपणापासूनच्या आठवणी त्यांनी हृदयातील कप्प्यात जोपासून ठेवलेल्या असतात. हा चिरंतन ठेवा कठीण रक्षाबंधनाप्रसंगी त्यांना आधार देत असतो. बहीण-भाऊ एकमेकांचे प्रेरणास्त्रोतही असतात. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. रक्षाबंधनासंदर्भात आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये उल्लेख आढळून येतो. रक्षाबंधनाची सुरुवात सतयुगापासून झाली, असा दावा केला जातो. रक्षाबंधनाला पुराणकाळात नेमके काय म्हटले जायचे? रक्षाबंधनाची सुरुवात साधारण कधीपासून झाली? पुराणात या संदर्भात कोणकोणत्या कथा आढळतात? जाणून घेऊया…

राखी म्हणजेच रक्षाला पूर्वी ‘रक्षासूत्र’ म्हटले जात होते. रक्षासूत्र बांधण्याची परंपरा वैदिक काळापासूनची आहे. हेच संरक्षण सूत्र नंतर नवरा बायको, आई-मूल आणि नंतर भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक बनले. रक्षासूत्राला सामान्य भाषेत राखी म्हणतात. जे वेदातील संस्कृत शब्द ‘रक्षिका’ या शब्दाचा अपभ्रंश आहे. मध्यकाळात याला राखी म्हटले जाऊ लागले, असे सांगितले जाते. देशाच्या प्रत्येक प्रांतात याला वेगवेगळे नाव आहे. दक्षिण भारतात नारळी पूर्णिमा, बलेव आणि अवनी अवित्तम, तर राजस्थानमध्ये रामराखी आणि चुडाराखी म्हटले जाते.

Google Ad

श्रावण पौर्णिमेला साजऱ्या केल्या जाणाऱ्या रक्षाबंधनासंदर्भात अनेक मान्यता आहेत. देशाच्या काही भागात याला गुरु-शिष्य परंपरेचे प्रतीक मानले जाते. राजा दशरथ आणि श्रावण बाळ भेट प्रसंगाशीही रक्षाबंधनाचा संबंध जोडला जातो. प्रथमेश असलेल्या गणपतीला सर्वप्रथम राखी अर्पण करावी, असे मानले जाते. यानंतर श्रावण बाळाच्या नावाने एक राखी काढून ठेवावी आणि त्याला ती समर्पित करावी. याशिवाय प्राणवायू देणाऱ्या वृक्षांनाही आपण एक राखी बांधू शकतो, असे सांगितले जाते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!