Google Ad
Editor Choice Pune

शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून अपहरण झालेल्या बहुचर्चित वकिलाचा खुन करणा – या वकिलांचा व त्यांच्या साथीदारांचा शिवाजीनगर पोलीस स्टेशनने केला पर्दाफाश

 

महाराष्ट्र 14 न्यूज : दिनांक ०२ ऑक्टोबर २०२० रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणे मिसिंग मधिल फिर्यादी प्रशांत चंद्रशेखर मोरे यांनी त्यांचा भाऊ उमेश चंद्रशेखर मोरे रा , प्लॅट नं . ९ दुसरा मजला गुरुदत्त अपार्टमेंट , पवार हॉस्पीटल शेजारी बालाजीनगर धनकवडी , पुणे हे दि . ०१.१०.२०२० रोजी शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरातून मिसिंग झाल्याबाबत तक्रार दिल्याने सदर मिसिंगच्या प्राथमिक तपासामध्ये अॅड . उमेश मोरे याचे अज्ञात इसमांनी अपहरण केल्याचे प्राथमिक दृष्टया दिसून आल्याने शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा नोंद केला होता .

यातील अपहरण झालेली व्यक्ती अॅड उमेश मोरे हे व्यवसायाने वकिल असल्याने त्यांचा व आरोपींचा तात्काळ शोध होणे करीता बार असोसिएशन पुणे यांचे शिष्टमंडळ तसेच इतरविविध शिष्टमंडळांनी मा पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांना भेटून निवेदन दिले होते . गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून अपहरीत वकिलाचा शोध घेणे करीता मा . पोलीस आयुक्त साो.पुणे शहर यांनी तपासाबाबत योग्य ते मार्गदर्शन करुन गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे तपासकामी शिवाजीनगर पोलीस ठाणे कडील ३ तपासपथके तयार करण्यात आली ,

Google Ad

नमुद पथकांनी पोलीस खात्यातील उपलब्ध साधन सामुग्री , तांत्रीक माहिती व घटनास्थळा वरील जवळपासचे तसेच पुणे शहरातील विवीध मार्गावरील सिसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन त्या आधारे कौशल्यपणास लावुन कोणताही पुरावा उपलब्ध नसताना तसेच गोपीनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळवुन सर्व माहिती संकलीत करुन दाखल गुन्हा आरोपी नामे १ ) कपिल विलास फलके वय ३४ वर्षे रा . रामदासनगर औदुयत हौसिंग सोसायटी , चिखली , पुणे २ ) दिपक शिवाजी यांडेकर वय २८ वर्षे रा , पोस्ट सालेवडगांव ता . आष्टी जि . बीड , यांनी केल्याचे निष्पन्न केले .

निष्पन्न आरोपींना दिनांक १८/१०/२०२० रोजी अटक करुन त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी नमुदचा गुन्हा हा त्यांचा साथीदार अॅड . रोहीत दत्तात्रय शेंडे वय ३२ वर्षे रा . स्वामी विवेकानंद सोसायटी , बंगला क्र .५ , संतनगर , मार्केटयार्ड पुणे याचे सांगण्यावरुन केलेचे सांगीतल्याने त्यास सुद्धा दाखल गुन्हयात त्याच दिवशी तात्काळ अटक करण्यात आले आहे . सदर आरोपींची तपासकामी मा न्यायालयातुन प्रथम ४ दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली रिमांड मुदतीत आरोपी रोहित दत्तात्रय शेंडे यांचेकडे केलेल्या तपासामध्ये त्याने दाखल गुन्हा हा मयत उमेश मोरे याने आरोपी रोहित शेंडे

याचे विरुद्ध अॅण्टी करप्शन ब्युरो येथे सन २०१८ मध्ये केलेल्या तक्रारीवरुन व त्यामध्ये आरोपी रोहित शेंडे यास अटक झाल्याने त्या कारणावरुन त्याने यातील आरोपी कपील फलके व दिपक वांढेकर यास अॅड.उमेश मोरे याचा खुन करण्यास सांगीतल्याने दोन्ही आरोपी यांनी उमेश मोरे यास आरोपी कपील फलके याचे कार नं एम एच १४ एफ एक्स 0०७२ हिचे मधुन शिवाजीनगर न्यायालयाबाहेरुन अपहरण करुन त्यास वारक ता मुळशी जि पुणे येथे नेवुन त्याचा दोरीने गळा आवळून खुन करून रस्त्यात पेट्रोल विकत घेवून त्यास आदरवाडी , ताम्हिणी घाट , ता मुळशी जि पुणे

येथे नेवून त्याचे अंगावर पेट्रोल टाकून जाळल्याचे सांगुन त्याचा खुन केलेचे ठिकाण दाखवीले आहे , त्यानंतर नमुद आरोपींची वेळोवेळी पोलीस कस्टडी वाढवुन त्यांच्याकडे केलेल्या सखोल तपासामध्ये व तांत्रिक माहितीच्या आधारे यातील मयत अॅड उमेश मोरे याचा खुन करण्यासाठी त्याचे अपहरण करण्यापुर्वी त्याचे ठाव ठिकाण्याबाबत अॅड रोहित शेंडे याचा मित्र व पुणे बार असोसिएशनचा सचिव अॅड घनःशाम दराडे याने आरोपी कपील फलके व दिपक वांढेकर यांना अॅड रोहित शेंडे

याचे सांगणेवरुन वेळो वेळी माहिती पुरविल्याचे सांगीतल्याने व तांत्रीक विष्लेशणावरुन अॅड घनःशाम दराडे हा गुन्हयाचे कटामध्ये सामील असल्याची खात्री झाल्याने व तसे निष्पन्न झाल्याने त्यास दाखल गुन्हयात दिनांक २७/१०/२०२० रोजी अटक करण्यात आली अशाप्रकारे गुंतागुतीचा व क्लिष्ट स्वरुपाचा शिवाजीनगर पोलीस स्टेशन कडील तयार करण्यात आलेल्या तपास पथकाने अहोरात्र कष्ट करुन , गुप्तरित्या तपास करुन गुन्हा उघडकीस आणलेला आहे व दाखल गुन्हयातील सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडित येरवडा जेल मध्ये आहेत .

गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर शिवाजीनगर पोलीस ठाणे पुणे हे करीत आहेत . सदरची कामगिरी ही मा . पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता , मा , अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग , श्री संजय शिंदे , पोलीस उप – आयुक्त परिमंडळ १ , डॉ . प्रियंका नारनवरे , सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग श्री सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . बाळासाहेब कोपनर , पोलिस निरीक्षक ( गुन्हे ) मनिषा झेंडे , सपोनि विजयकुमार शिंदे , पो उप निरी कुमार पाटील , पोलीस उप निरीक्षक संदिप चव्हाण , व पोलीस अंमलदार भालचंद्र बोरकर , प्रविण राजपुत , बशिर सय्यद , रणजीत फडतरे , आरिफ आत्तार . पुष्पा बुट्टे , दिलीप गोरे , सागर रासकर , शरद राऊत , राहुल होळकर , विजय मोरे , अभिजीत पालके यांनी केलेली आहे .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!