Google Ad
Editor Choice Pune District

Pune : तोतया आर्मी अधिकाऱ्याचा पर्दाफाश , ग्रामीण पोलिसांच्या LCB कडून अटक

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एका तोतया आर्मी अधिकाऱ्याचा पर्दाफाश करत मुसक्या आवळ्या आहेत. किरकटवाडी भागात ही कारवाई करण्यात आली आहे. नुकतीच आर्मी लेखी परीक्षेत होणार घोटाळा लष्कराच्या मदतीने पुणे पोलिसांनी उघड आणला होता. अंकित कुमार सिंह (वय 23, रा. उत्सव सोसायटी किरकट्वाडी मूळ रा. हसनपूर आमरोह उत्तर प्रदेश) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. तर त्याच्या पत्नीला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात सुरू असणाऱ्या अवैध प्रकार रोखण्याचे आदेश नवं नियुक्त पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले आहेत. यादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट हे पथकासह याठिकाणी गस्त घालत असताना त्यांना किरकटवाडी भागात एकजण आर्मी अधिकारी असल्याचे सांगत फिरत असून, तो नागरिकांना फसवत असल्याची माहिती मिळाली.

Google Ad

तो लेफ्टनंट कर्नल असल्याचे सांगत असे. या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानुसार आज त्याच्याकडून दहा ओळखपत्रे, दोन मोबाईल,एक टॅब, प्रिंटर, लॅपटॉप, मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे, लष्कराचा पोषाख, लष्कराची महत्त्वाची ओळख चिन्हे, लष्करी बूट, पट्टा, लष्कराच चिन्ह असलेली टोपी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल गोरे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय जगताप, कर्मचारी मंगेश भगत, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, काशिनाथ राजापुरे, सुनिता माने यांच्या पथकाने त्याला सापळा रचून पकडले.

चौकशीनंतर त्याची पत्नी मीनाक्षी हिला देखील पोलिसांनी पकडले आहे. अधिक तपासासाठी त्या दोघांना हवेली पोलिसांकडे देण्यात आले आहे.

त्याच्याकडून दहा ओळखपत्रे, दोन मोबाईल, एक टॅब, प्रिंटर, लॅपटॉप, मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे, लष्कराचा पोषाख, लष्कराची महत्त्वाची ओळख चिन्हे, लष्करी बूट, पट्टा, लष्कराच चिन्ह असलेली टोपी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!