Google Ad
Editor Choice Maharashtra

Aurangabad : भाजपला हादरा! बड्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम ; राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता

महाराष्ट्र 14 न्यूज : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यसमिती सदस्यत्वाचा, तसेच प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवला आहे. यानंतर आता ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर चालणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
जयसिंग गायकवाड यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्यासोबत काम केलं आहे.

संघाचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी मराठवड्यात मोठं काम केलं आहे. भाजपने त्यांना बीड मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली होती, त्यात ते विजयी झाले. त्यानंतरची निवडणूक ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढले आणि विजयी झाले. यानंतर त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु आता पदवीधर मतदारसंघातून त्यांनी तयारी केली असताना पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने गायकवाड यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

Google Ad

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!