Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

नवी सांगवीतील संस्कृती लॉन्स मंगल कार्यालयात कोविड केअर सेंटर उभारा … राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष ‘प्रशांत शितोळे यांनी केली पिं.चिं. आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ एप्रिल) : पिंपरी – चिंचवड शहरात कोरोना संसर्गाने उद्रेक केला आहे . अनेक ठिकाणी रुणांना सरकारी व खाजगी रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध होत नाहीत व त्यामुळे अनेकाना आपला जीव गमवावा लागत आहे . याकरीता माजी नगरसेवक व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष ‘प्रशांत शितोळे’ यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे, यात त्यांनी म्हटले आहे, की शहरात अनेक ठिकाणी ऑक्सीजन बेड, सेमी व्हेंटिलेटर , व्हेंटिलेटर अशा विविध प्रकारच्या बेडची आवश्यकता असूनही नागरिकांना बेड उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे नागरिकांच्या जीवाच्या धोक्याचे प्रमाण सुद्धा वाढले असून मृत्यू प्रमाण वाढल्याचे दिसून येते .

सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव हा परिसर जवळपास तीन लाख लोकसंख्येचा असून या परिसरातील कोरोना बाधित व्यक्तींची संख्या सुद्धा काही हजारांमध्ये झाली आहे, व या परिसरात त्या प्रमाणात या आजारकरिता वैद्यकीय उपचाराची कोणतीही महानगरपालिकेची सुविधा उपलब्ध नाही . महानगरपालिकेच्या वतीने असणारी सर्व मोठी रुग्णालये यामध्ये जम्बो कोविड सेन्टर, वाय सी एम एच , ऑटो क्लस्टर येथे असणाऱ्या सुविधाप्रमाणे एकही मोठी सुविधा सांगवी, नवी सांगवी पिंपळे गुरव , पिंपळे सौदागर , रहाटणी, काळेवाडी, थेरगाव, वाकड या परिसरात उपलब्ध नाही ही परिस्थिती आहे .

Google Ad

नवी सांगवी भागात आमच्या परिवाराच्या मालकीचे संस्कृती लॉन्स नावाचे मंगलकार्यालय असून या ठिकाणी काही प्रमाणात नागरिकांना बेड उपलब्ध करून देण्यामाठी आम्ही तयार असून, याकरिता असणारी वैद्यकीय सेवा महानगरपालिकने द्यावी. अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना दिले, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघिरे, आणि विरोधी पक्षनेते राजू मिसाळ उपस्थित होते. याबाबतचा निर्णय तातडीने घेऊन कळवा व त्या प्रमाणे कारवाई करावी अशी मागणी व विनंती केली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

398 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!