Google Ad
Editor Choice Maharashtra

Delhi : आता बसणार सर्व सामान्यांच्या खिश्याला कात्री … सिलेंडरचे दर इतक्या रूपयांनी वाढणार

महाराष्ट्र 14 न्यूज : सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसागणिक वाढत आहेत. याचदरम्यान आता दिल्लीकरांना मोठा धक्का बसणार आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यानंतर आता सिलेंडरच्या दरात देखील वाढ होणार आहे. जर तुम्ही दिल्लीत राहत असाल तर तुमचं महिन्याचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीत सिलेंडरच्या दराने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे आता दिल्लीकरांच्या खिश्याला कात्री बसणार आहे. सिलेंडरचे हे वाढीव दर येत्या सोमवारपासून लागू होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत गॅस सिलेंडरचे दर ५० रूपयांनी वाढणार आहे. त्यामुळे आता सोमवारपासून गॅस सिलेंडरसाठी 769 रूपये मोजावे लागणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी दिल्लीत विना अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या. त्यावेळी अनुदानाशिवाय सिलेंडरचे दर 694 रुपयांवरून 719 करण्यात आले.

Google Ad

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. ऐकीकडे एलपीजी सिलेंडरचे दर सतत वाढत आहेत, तर दुसरीकडे केंद्र सरकारने आर्थिकवर्ष 2022साठी पेट्रोलियम सब्सिडी हटवून 12 हजार 995 करोड रूपये केले आहेत. दरम्यान केंद्र सरकार लवकरच एलपीजी सिलेंडरवरील सब्सिडी रद्द करेल असा अंदाज वर्तवण्यात आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या विक्रीवर सरकारकडून अनुदान मिळते अनुदानात मिळणारी ही रक्कम थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

54 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!