Google Ad
Uncategorized

ससून रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात …. महाविद्यालयात दोन महिला डॉक्टरांवर रॅगिंग

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ एप्रिल) : पुण्यातील बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सामान्य रुग्णालय पदव्युत्तर पहिल्या वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांना टार्गेट करून रॅगिंगच्या (Ragging) गंभीर घटना घडल्या आहेत. त्यामुळे ससून रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. गेल्या महिनाभरात घडलेल्या या घटनांमध्ये रेडिओलॉजी विभागात शिकणाऱ्या दोन महिला डॉक्टरांवर रॅंगिर झाली आहे.

सध्या घडत असलेल्या घटनांमुळे कॉलेज आणि हॉस्पिटल चौकशीचा विषय बनले असून रॅगिंगच्या या ताज्या बातम्यांमुळे त्यांच्या प्रतिष्ठेला आणखी धक्का बसला आहे. परिस्थितीचे गांभीर्य असूनही विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि घटनांबाबत मौन बाळगून कॉलेज प्रशासनाने या घटनांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला आहे. वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून छळ होत असल्याच्या तक्रारी दोन्ही विद्यार्थ्याीनींनी कॉलेज प्रशासनाकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली. बी. जे. मेडिकल कॉलेजच्या रॅगिंग विरोधी समितीने तक्रारींचा तपास करून तक्रारदार आणि बाकीच्यांची चौकशी करत आहेत.

Google Ad

हा चौकशी अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांच्याकडे पाठविण्यात आला होता. मात्र, या अहवालावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसून दुसऱ्या विद्यार्थ्याच्या तक्रारीचा तपास सुरू आहे. प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने रॅगिंगच्या घटना हाताळण्याच्या महाविद्यालयाच्या कार्यावर आणि संस्थेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

पहिल्या घटनेत रेडिओलॉजी विभागात वैद्यकीय पदव्युत्तरच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यीनीने सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय रॅगिंगची तक्रार दाखल केली. रॅगिंग विरोधी समितीने या प्रकरणाची चौकशी करून आपला अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्तांना सादर केला. गेल्या आठवड्यात घडलेल्या दुसऱ्या घटनेत अॅनेस्थेसिओलॉजी विभागातील पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यीनीने रॅगिंगची तक्रार दाखल केली. रॅगिंग विरोधी समितीने चौकशी केली असून आता या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!