Google Ad
Uncategorized

ढोलताशांच्या गजरात रांगोळ्यांच्या पायघड्यानी पिंपळे गुरव मध्ये हिंदू नववर्षा निमित्ताने शोभायात्रेचे नागरिकांनी केले जल्लोषात स्वागत !

पिंपळे गुरव मध्ये गुढीपाडवा हिन्दू नववर्ष निमित्त स्वागत शोभायात्रा….

ढोलताशांच्या गजरात रांगोळ्यांच्या पायघड्यानी पिंपळे गुरव मध्ये हिंदू नववर्षा निमित्ताने शोभायात्रेचे नागरिकांनी केले जल्लोषात स्वागत !

Google Ad

महाराष्ट्र 14 न्यूज, (ता. ०९ एप्रिल) : पिंपळे गुरवमध्ये गुढी पाडव्याच्या सणाचा, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या यामुहूर्ताचा गुढी पाडव्यानिमित्त नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत होता. हिंदु नववर्षानिमित्त ‘संस्कृती संवर्धन समिती’,व लोकनेते लक्ष्मण जगताप  आणि शंकर जगताप मित्र परिवार यांच्या वतीने  मोठ्या उत्सवात शोभायात्रा काढण्यात आली.

हिंदू ऐक्याचे शक्तिशाली व सांस्कृतिक एकत्रिकरण येथील नागरिकांच्या पारंपरिक वेशभूषेत भगवे ध्वज आणि भगव्या टोप्या आणि फेटे परिधान करून मोठ्या महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होऊन जय श्रीराम च्या घोषणा देण्यात आल्या.पिंपळे गुरव येथे तुळजाभवानी मंदिर पासून जल्लोषात स्वागतयात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा, भगवे ध्वज, नाक्यानाक्यांवर काढलेली आकर्षक रांगोळी, रस्ता दुभाजकांवर उभारलेल्या गुढ्या अशा मंगलमय वातावरणात स्वागतयात्रा निघाली, मार्गांवरून रथयात्रा येत असताना अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी, स्वागतासाठी रांगोळ्या, पताकांनी वातावरण भगवेमय झाले होते. पिंगळे गुरव भागात स्वागतयात्रेच्या मार्गावर सर्वत्र गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. स्वागतयात्रेमध्ये प्रभू श्रीराम, कृष्ण यांचे देखावे सादर केले. तसेच भजन पथक, ढोल-ताशे पथकांनी कार्यक्रमात रंगत आणली.

रथामध्ये रामाची मूर्ती विराजमान होऊन या रथयात्रेस प्रारंभ पिंपळे गुरव येथील तुळजा भवानी माता मंदिर येथून झाली.यात ढोलताशांच्या गजरात रथयात्रे पुढे नागरिकांकडून ठिकठिकाणी भव्य रांगोळ्यांचं आयोजन करण्यात आलं होत. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी आणि शोभयात्रेच्या स्वागतासाठी सगळेजण सज्ज झालेले दिसून आले.शोभा यात्रा लक्ष्मी नगर,६० फुटी रोड, रामकृष्ण मंगल कार्यालय चौक,काटेपुरम चौक,खाडे बाबा मठ,राजमाता जिजाऊ उद्यानाकडून समारोप गावठाणतील हनुमान मंदिर पिंपळे गुरव येथे झाला.

या शोभायात्रेत विजय पांडुरंग जगताप, शशिकांत कदम, राजेंद्र राजापुरे, संजय जगताप, डॉ. देविदास शेलार, सागर अंगोळकर, महेश जगताप, रमेश काशीद सुनील कोकाटे, राजू नागणे, संदीप दरेकर, भाऊसाहेब जाधव, शिवाजी कदम, उमेश झरेकर, मनोज ठाकूर, साई कोंढरे, सखाराम रेडेकर, ललित म्हसेकर, स्मिता अत्रे, अंजली खटावकर, रेणुका, कुलकर्णी, वैशाली गायकवाड, अनिता ठाकुर, अंजली खटावकर, उषा मुंडे, मेहता, गौरी रुईकर, लिना पाटिल,ममता पवार तसेच  नवी संगवी पिंपळे गुरव मधी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी पुरुष आणि महिला वर्ग हा शोभायात्रेत अत्यंत हिरीरीने आणि नटून-थटून सहभागी झाल्याचे दिसत होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!