Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

सांगवीच्या माय लेकीचा दुचाकी- कार यांच्या अपघातात जागीच मृत्यू!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येथे दुचाकीवरून जाणाऱ्या मायलेकींचा समोरून येणाऱ्या कारच्या धडकेत मृत्यू झाला . ही घटना शुक्रवारी ( ४ डिसेंबर ) सांगवीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुलाजवळ असणाऱ्या वसंतदादा पुतळ्याशेजारी दुपारी चारच्या सुमारास घडली . या प्रकरणी कपिल गिरीधारिलाल अगरवाल ( वय ५४ , रा . प्रियदर्शनीनगर , जुनी सांगवी ) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी कारचालक आकाश विनायक गायकवाड ( २७ , रा . महात्मा फुले नगर, दापोडी ) याला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी यांची पत्नी व मुलगी दुचाकीवरून दापोडीवरून सांगवीकडे जात होत्या . या वेळी आरोपीच्या भरधाव जाणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली . या धडकेत गंभीर जखमी झालेल्या मायलेकींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला .

Google Ad

या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार आरोपी कारचालकाला पोलिसांनी अटक केली आहे . अपघाताची घटना घडताच वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी घटनास्थळी भेट दिली . संबंधित मार्गावर दोन्ही बाजूंनी गतिरोधक करणे , पथदिवे बसविणे , झाडांच्या फांद्या तोडणे अशा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या असल्याचे समजते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

73 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!