Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कर्णकर्कश आवाजाचे फटाके फोडणाऱ्या बुलेट चालकांचा आवाज सांगवी पोलिसांनी केला दंड लावून बंद!

महाराष्ट्र 14 न्यूज : आधुनिक काळात बुलेटचा सायलन्सर बदलून फटाक्यांसारखा मोठा आवाज करणाऱ्या तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी दिले आहेत. त्यानंतर आठवडाभरात वाहतूक पोलिसांनी अशा अनेक वाहन चालकांवर कारवाई केली. यामध्ये प्रामुख्याने अनेक स्मार्ट हीरो बुलेट चालकांचा समावेश आहे.

याला चाप बसविण्याकरीता सांगवी पोलीस ठाण्याच्या वतीने साई चौक नवी सांगवी येथे वाहतूक पोलिसांनी मुख्य रस्त्यावर कारवाईचा धडका लावला आणि दंडात्मक कारवाई केली. बुलेटचा सायलन्सर बदलल्यास एक हजार रुपयांचा दंड आहे. तर फॅन्सी नंबरप्लेट लावल्यास दोनशे रुपयांचा दंड आहे. तसेच यावेळी तोंडाला मास्क न लावणाऱ्यावरही कारवाई करण्यात आली.

Google Ad

काहीजण जाणिवपूर्वक दुचाकीला कर्णकर्कश आवाज देणारे सायलेंसर लावतात. यामुळे रस्त्याने जाणारे वाहनचालक, वृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले यांना नाहक त्रास होतो. गल्ल्या गल्ल्यात अशी मंडळी जाणीवपूर्वक त्रास देत असतात.

आज नवी सांगावी येथे रंगनाथ उंडे पोलीस निरीक्षक सांगवी पोलीस स्टेशन अजय भोसले पोलिस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिदास बोराडे ( बापू ) , गिरीश राऊत, प्राजक्ता चौगुले, नितीन काळे,चंदू जायभाय यांनी कारवाई केली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!