Google Ad
Editor Choice Pune

Pune : मराठा आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेडचे पुण्यात लाल महाल येथे मशाल आंदोलन!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे मराठा आरक्षणालास्थगिती मिळाली असल्याने समाजात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे . शिक्षणमंत्र्यांनी काढलेला अध्यादेश तत्काळ रद्द करावा , तसेच मराठा आरक्षणाची स्थगिती उठवावी , या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मशाल आंदोलन करण्यात आले .

या आंदोलनामध्ये संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर , शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ , विराज तावरे , जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे , अविनाश मोहिते , संतोष शिंदे , नीलेश ढगे , मंदार बहिरट यांसह कार्यकर्ते उपस्थित होते . विकास पासलकर म्हणाले , मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करावा , शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काढलेला अध्यादेश तत्काळ रद्द करावा , मराठा विद्यार्थ्यांच्या नव्याने होणाऱ्या सर्व प्रवेश प्रक्रियांमध्ये ५० % फीसवलत द्यावी व त्याची जबाबदारी सरकारने घ्यावी .

Google Ad

जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत पोलिस भरतीसह कुठलीही मेगाभरती केली जाऊ नये , राज्य सरकारने ‘ सारथी’ला तत्काळ वाढीव आर्थिक मदत एमपीएससीच्या होऊ घातलेल्या द्यावी परीक्षांसंदर्भात मराठा मुलांनी एससीबीसीच्या कोट्यातून फॉर्म भरले , त्याचं काय होणार याचा खुलासा तत्काळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने करावा , मराठा आरक्षणावरील स्थगिती त्वरित हटवावी आणि तोपर्यंत मराठा समाजाचा समावेश ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये करावा , सरकारने मराठा आरक्षणाला संरक्षित करण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करावी , आदी मागण्या आहेत .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!