Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

हिंजवडी आयटी हब सह पिंपरी चिंचवड शहरा लगतच्या सात गावांचा मनपा क्षेत्रात समावेश करण्याबाबत … आमदार लक्ष्मण जगताप यांचा प्रस्ताव!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरा लगतच्या सात गावांचा मनपा क्षेत्रात समावेश करण्याबाबत ‘आमदार लक्ष्मण जगताप’ यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव पाठविला आहे, यात लक्ष्मण जगताप यांनी म्हटले आहे, ‘की पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने नगरविकास विभागाकडे हिंजवडी , मान , मारुंजी , गहुंजे , नेरे , सांगवडे , जांबे या पिंपरी – चिंचवड मनपा क्षेत्रालगत असलेल्या गावांचा समावेश करण्यात यावा. देशात आयटी क्षेत्रात नामांकित असलेले हिंजवडी आयटी हब व गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट ग्राउंड परिसराचा विकास होत असताना मुलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात ग्राम पंचायतीना मोठया प्रमाणावर अपयश येत असल्याने वाढत्या लोकसंख्येमुळे सदर परिसराचा बकालपणा वाढत आहे .

सदर गावातील ग्रामपंचायती निधी अभावी सार्वजनिक सेवा सुविधा देण्यास असमर्थ ठरत असल्याने कचरा , पाणीपुरवठा , रस्ते , पथदिवे असे प्रश्न या भागात मोठ्या प्रमाणात भेडसावत असून या गावांचा सर्वांगीन विकास नियोजनबध्द होणे आवश्यक असल्याने सदर गावांचा पिंपरी – चिंचवड मनपा क्षेत्रात समाविष्ट केल्यास विकास होणे सोयीचे होईल . हिंजवडी , मान , मारुंजी , गहुंजे , न्हरे , सांगवडे तसेच जांबे या गावांचा पिंपरी – चिंचवड शहरात समावेश करणेबाबतच्या प्रस्तावास तात्काळ मान्यता देण्याबाबत संबंधितांना योग्य ती कार्यवाहीचे आदेश निर्गमित करावे, अशी मागणी या प्रस्तावात आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री यांना केली आहे.

Google Ad

या अगोदरही आमदार लक्ष्मण जगताप यांनी शासनास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत नवीन गावांचा समावेश करण्याबाबत . दि .०४ मार्च २०२० रोजी पत्र दिले होते. तसेच पिंपरी चिंचवड आयुक्तांनीही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ११ गावे समावेश करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव दिलेला आहे . यावर पुढील कार्यवाही करण्याच्या दृष्टीकोनातून विभागीय आयुक्त , पुणे विभाग , पुणे यांचे अभिप्राय मागविण्यात आलेला होता . यावर अभिप्राय प्राप्त झाल्यावर या प्रकरणी पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सतीश मोधे उप सचिव , महाराष्ट्र शासन यांनी १५ ऑक्टोबर २०२० ला कळविले होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

112 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!