Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड भाजपच्या पक्ष कार्यालयात पदवीधरांचे नोंदणी फॉर्म जमा … प्रभाग क्रं.३१ नवी सांगवी-पिंपळे गुरव मधून उत्स्फूर्त नोंदणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी येत्या १ रोजी डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांवरून रस्सीखेच चालली असताना निवडणूक आयोगाने या निवडणुकीची घोषणा केली. नागपूर, पुणे व औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ आणि अमरावती व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर भाजपच्यावतीने रविवार ( दि .१ नोव्हेंबर ) रोजी संपूर्ण शहरात साधारण शंभर ठिकाणी’ पदवीधर मतदार नोंदणी ‘ महाअभियान राबविण्यात आले. या अभियानाद्वारे एकाच दिवशी पक्षाचे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रभाग स्थरावर हौसिंग सोसायटी मध्ये मतदारांची नोंदणी केली. चिंचवड विधानसभेचे ‘आमदार लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदार संघात हे नोंदणी अभियान राबविण्यात आले.

Google Ad

यामध्ये चिंचवड, पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदार संघात साधारणपणे आठ हजार पदवीधरांनी आपली नोंदणी केली. पिंपरी चिंचवड शहरात प्रभाग क्रमांक ३१ मध्ये मतदार नोंदणी करीता तरुणांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसून आला. हे पदवीधर मतदान नोंदणी अभियान रविवार दिनांक १ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत राबविण्यात आले, यामध्ये नगरसेवक अंबरनाथ कांबळे, नगरसेविका माधवी राजापूरे, नगरसेविका सीमा चौगूले, राजेंद्र राजापूरे, मारुती कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक ३१ नवी सांगवी-पिंपळे गुरव मधून ४३ पदवीधरांची ऑनलाइन नोंदणी व २६४ ( पदवीधर नोंदणी) फॉर्म भरण्यात आले.

हे फॉर्म भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात जमा करण्यात आले. यावेळी माजी स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापूरे, भाजपचे पिंपरी चिंचवड शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, जिल्हा सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजु दुर्गे, विजय फुगे, सांगवी-काळेवाडी चिटणीस भाऊसाहेब जाधव, उपाध्यक्ष सुरेश शिंदे,चंद्रकांत बेंडे, संजय परळीकर उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!