Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

प्रधानमंत्री आवास योजनेचे अर्ज स्वीकृतीस मुदतवाढ देणेबाबत … पिंपरी चिंचवडच्या ‘महापौर माई ढोरे’ यांची मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : केंद्रीय गृहनिर्माण व शहरी गरीबी निर्मुलन मंत्रालयाकडील प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शन सुचनांनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत च – होली , रावेत , व बो – हाडेवाडी येथील आरक्षित जागांवर सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे . तथापि सदर योजनेकरिता अर्ज भरणेची मुदत ही दि .१७ / ० ९ / २०२० रोजी संपुष्टात येत आहे . पिंपरी चिंचवड ही औद्योगिक व कामगार नगरी असून अनेक गोरगरीब कामगार हे पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत .

कोरोना विषाणूचे संकट व लॉकडाऊनमुळे बरेच उद्योग , व्यवसाय हे पूर्वपदावर न याने ब – याच गोरगरीब कष्टकरी , कामगार व खाजगी नोकरदार वर्गास जीवन जगण्याची भ्रांत पडलेली आहे . तसेच सध्या रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे . तसेच सदर योजनेकरिता अर्ज भरण्यास नागरिकांना आधारकार्ड , पॅनकार्ड , मतदान ओळखपत्र , जात प्रमाणपत्र , उत्पन्नाचा दाखला , बँक खाते व इतर संबंधित कागदपत्रे तसेच र.रु .५,००० / – चा डी.डी. देणे आवश्यक आहे .

Google Ad

परंतु शहरातील बहुतांशी नागरिकांची सदर अर्जाची प्रक्रिया अद्याप पुर्ण झाली नसल्याने व अर्ज मुदतीत सादर करणेकामी अडचण निर्माण होत आहे . या सर्व गोष्टींचाविचार करून शहराच्या महापौर उषा उर्फ़ माई ढोरे यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे, यात महापौर यांनी, सध्या प्रधानमंत्री आवास योजनेचे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकानंतर पुढील पंधरा दिवस मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!