Google Ad
Editor Choice Maharashtra

एका कोरोना पॉझिटिव्ह पत्रकार मित्राची व्यथा वाचा त्यांच्याच शब्दांतून … आणि पुढे काय, करायचे ते आपणच ठरवा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ एप्रिल) : “चांगला माणूस बना…हजारो हात मदतीसाठी येतील”

“कोरोनाला काय घाबरायच झाल्यावर बघू… आपल्याला होत नसतो”.. या अशा अनेक वल्गना करणारे आजूबाजूला असतं त्यामुळे आपणही बऱ्याचदा एखाद्या गोष्टीला गांभीर्याने घेत नाही ..ज्यावेळेस मला कोविडला सामोरे जाण्याची वेळ आली. त्या वेळेस नक्की हा काय महाभयानक प्रकार आहे ते समजले.

Google Ad

या महाभयानक प्रकाराला मी देखील सामोरा गेलो साधारण 24 मार्च दरम्यान घसा दुखणे , अंगात कणकण असे त्रास जाणवू लागले .तातडीने काही डॉक्टर मित्रांच्या सल्ल्याने चाचण्या केल्या. चाचणी पॉझिटिव्ह आली. तशी लक्षणे सौम्य होती त्यामुळे डॉक्टरच्या सल्ल्याने घरी उपचार सुरू होते. यादरम्यान अनेक डॉक्टर मित्र , माझे मिडियातील सहकारी संपर्कात होते आणि त्यांनी मला दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यासाठी सांगितले. परंतु लक्षणे तर सौम्य आहेत. बघूया दोन दिवस उपचार घेऊन अशा संमिश्र भावनेतून तब्बल पाच दिवस मी घरी काढले. त्यानंतर मात्र माझ्या काही डॉक्टर मित्रांनी मला आमच्या समोरच तुझे उपचार होऊ देत म्हणून दवाखान्यात ऍडमिट होण्यास सांगितले. आकुर्डी येथील स्टार हॉस्पिटल मध्ये मी त्वरित दाखल झालो आणि डॉक्टरांच्या निगराणी खाली उपचार सुरू झाले. गोळ्यांचा मारा, रेमडीसीवरच्या टोचण्या झाल्यानंतर कवर व्हायला सुरुवात झाली होती.

खरं सांगतो मित्रांनो या काळात अनेक जण एकमेकांपासून दुरावली आहेत. मात्र आपण किती जणांच्या मदतीला त्यांच्या वेळेत पोहोचलो होतो. त्याची परतफेड आपल्याला कशी मिळते. याची पावती या कठीण काळातच मला मिळत आहे. गेली दोन वर्ष मी माझ्या मीडिया फिल्डपासून लांब आहे. मात्र मला या काळात ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांनी हे दाखवून दिलं की माणूस म्हणून चांगल असल्याशिवाय आपला कठीण काळ कधीच सुखकारक होत नाही. ज्या माझ्या जुन्या मित्रांना समजले कि मी कोरोनाशी लढा देत आहे. त्या सर्वांनी मला त्यांना जमेल तसा माझ्याकडे संपर्क साधत माझी विचारपूस केली. महाराष्ट्रातून आठ डॉक्टर माझी टेलीमेडिसीनद्वारे , तर काही समक्ष येऊन विचारपूस आणि उपचार करत होते. हे सांगण्याचा मोठेपणा हाच की मी आयुष्यात खूप चांगली “माणसे” कमावली.

यामध्ये डॉ. मनीष पाठक, डॉ. प्रवीण वारकरी, डॉ. विशाल पोद्दार, dr विनय चपळगावकार डॉ. प्रमोद सरनोत डॉ. कुबड़े सर डॉक्टर, डॉ. राजेंद्र देशमुख , डॉ. निलेश, डॉ. समीर देशमुख असे अनेक जण ज्यांनी मला नवे जीवनदान दिले आहे . याशिवाय आमचे चौधरी काका dr नानां संदीप घिसे ज्यांनी वेळोवेळी मला मोटिव्हेट केले . तर राजकीय क्षेत्रातील सुलभाताई उबाळे , सीमाताई सावळे , अंबरजी चिंचवडे यांनी ”कधीही फोन कर मदतीला आम्ही आहोत” ही आश्वासक मदतीची साथ दिली . वृत्तपत्र क्षेत्रातील विनोदजी पवार हे नाव आवर्जून मला घ्यावेसे वाटते कुठल्याही गोष्टीसाठी फोन करा हा माणूस तुम्हाला निर्णायक उत्तर दिल्याशिवाय राहत नाही आणखी एक सहकारी अश्विनी भोगाडे, मित्र सुधीर काळजे माझे सासरे महेश काका कुलकर्णी आणि बाबू शेट्टी आबि अनेक यांचे देखील चौकशीचे फोन येत होते.

या सर्वात आवर्जून उल्लेख करावा लागेल म्हणजे सावलीसारखा माझ्या पाठीशी उभा राहिलेला रंजीत जाधव. हे एक अजब रसायन आहे मी त्याला धन्यवाद दिलेल त्याला आवडणार नाही. मात्र आपला जीव धोक्यात घालून तो देखील माझ्यासाठी झटत होता.

माझा मेहुणा, मुंबईवरून फोन करणारे रूपा…वृषभ जी जैन यश जी कर्णावट असे एक ना अनेक जण विचारपूस करत होती. हि आपुलकी माझ्यासाठी त्या ” रेमडिसीवर ” पेक्षाही जास्त एनर्जी देणारी होती.

या सगळ्या परिस्थितीत मी एकच अनुभव घेतला तुम्ही चांगला माणूस बना…हजारो हात मदतीसाठी येतील..

या सगळ्यांनाच मनःपूर्वक धन्यवाद…thanks

Google Ad

About the author

Maharashtra14 News

71 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!