Google Ad
Editor Choice india

Rajsathan : भाजप आमदार किरण माहेश्वरी यांचा कोरोनामुळे मृत्यू … राजकीय क्षेत्रात हळहळ!

महाराष्ट्र 14 न्यूज : राजस्थानच्या बेलगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राजस्थानच्या राजसमंद मतदारसंघातील भाजपच्या ज्येष्ठ आमदार किरण माहेश्वरी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हरियाणातील गुरुग्राम याठिकाणच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माहेश्वरी यांच्या अकाली निधनामुळे राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

किरण माहेश्वरी यांना भाजपाच्या कोटा उत्तर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्यात कोटा महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान माहेश्वरी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र काल (29 नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास त्यांची प्रकृती खालावली. यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

Google Ad

माहेश्वरी यांच्या निधनानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक नेत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. ‘राजस्थानच्या राजसमंद मतदारसंघातील आमदार बहिण किरण माहेश्वरी यांनी आपले संपूर्ण जीवन समाजसेवा आणि जनतेच्या हितासाठी वाहिले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!