Google Ad
Editor Choice

सांगवी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ३१ मे २०२२) : अनिष्ट रुढी परंपरा आणि प्रथेविरुध्द लढा देऊन कुशल राज्य कारभार करणा-या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य सर्वांसाठी आदर्शवत आहे, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.

          पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  राजमाता अहिल्यादेवी यांच्या महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस आणि मोरवाडी चौकातील पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले, त्यावेळी आयुक्त पाटील बोलत होते.

Google Ad

          आयुक्त राजेश पाटील म्हणाले, कुशल प्रशासक म्हणून अहिल्यादेवी होळकर यांनी राज्य कारभार केला.  देशभरात लोकोपयोगी सुविधा उपलब्ध करुन देऊन त्यांनी समाजकार्याचा वसा जोपासला.  शिक्षणाला प्राधान्य देत त्यांनी महिलांचे सक्षमीकरण केले.  न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष आणि दानशूर राज्यकर्त्या म्हणून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य राज्यकर्त्यांसाठी दिशादर्शक आहे असे आयुक्त  पाटील म्हणाले.  सध्या मेट्रो रेल्वेचे काम सुरु आहे, हे काम पुर्ण झाल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मोरवाडी चौकातील पुतळा योग्य जागेत स्थलांतरीत करण्यात येणार आहे.   त्यांच्या कार्याला शोभेल असे पुतळा परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार असल्याचे आयुक्त पाटील यांनी सांगितले.           

मोरवाडी चौक येथे झालेल्या कार्यक्रमावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहआयुक्त आशादेवी दुरगुडे, माजी नगरसेवक मारुती भापकर, राजू दुर्गे, क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, उपअभियंता बाबासाहेब शेटे, कनिष्ठ अभियंता शैलेश मोरे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण रुपनर, सदाशिव पडळकर, महावीर काळेसर, दिपक भोजने, नारायण राहिंज, माणिकराव बारगळ, नामदेव सोनवलकर,भुजंग दुधाळे, रोहिदास पोटे, तानाजी ढाले, प्रदीप काळे, शंकर दातीर, सचिन शिंदे, नागेश वाघमोडे, दादा देवकाते, रोहित वाघमोडे, नितीन वाघमोडे, दत्ता वाघमोडे, जिजाबापू दातीर, संजय कवितके, प्रसाद होले, नागनाथ वायकुळे आदी उपस्थित होते.

          पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या सांगवी येथील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप आणि माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.  यावेळी क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, कार्यकारी अभियंता दिलीप धुमाळ, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, दिलीप तनपुरे, डॉ.देविदास शेलार,  अभिमन्यू गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते अजय दुधभाते, मनोजकुमार मारकड, जवाहर ढोरे, सुर्यकांत गोफणे, बाबासाहेब चिथळकर, सुधाकर सुर्यवंशी, विनायक पिंगळे, मधुकर लंभाते आदी उपस्थित होते. 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!