Google Ad
Editor Choice Maharashtra

Pune : अजित पवारांच्या पुढाकाराने एकनाथ शिंदे यांनी घेतला पुण्यकरिता मोठा निर्णय!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे महापालिका हद्दीत 23 गावे समाविष्ट करण्यासाठी देण्यात आलेल्या प्रस्तावाला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे 23 गावं पुणे महापालिकेत समाविष्ट होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यासंदर्भात अध्यादेश काढण्याची प्रक्रिया काही दिवसांत पूर्ण होणार आहे. त्यानंतर ही गावे महापालिकेत समाविष्ट होतील, अशी माहिती आमदार चेतन तुपे यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय झाला आहे.

पुणे महापालिकेच्या हद्दीतील 34 गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. त्यानंतर युती सरकारच्या काळात 11 गावे महापालिकेत समाविष्ट करण्यातही आली. उर्वरित गावंही टप्प्याटप्प्यानं महापालिकेत घेण्यात येतील असं शपथपत्रही देण्यात आलं होतं. त्यानंतर ही गावं महापालिकेत घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला. आता या निर्णयानंतर प्रस्ताव मंजूर करुन पुढील महिल्यात निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यातच 10 हजार कोटी रुपयांचा निधी लागेल, असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

Google Ad

ती 23 गावे कोणती?

खडकवासला
किरकटवाडी
कोंढवे धावडे
मांजरी बुद्रूक
नांदेड
न्यू कोपरे
नऱ्हे
पिसोळी
शेवाळवाडी
काळेवाडी
वडाची वाडी
बावधन बुद्रूक
वाघोली
मांगडेवाडी
भिलारेवाडी
गुजरवााडी
निंबाळकरवाडी
जांभूळवाडी
होळकरवाडी
औताडे हांडेवाडी
मंतरवाडी
नांदोशी
सूस
म्हाळुंगे

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!