Google Ad
Editor Choice Education Pune

Pune : औंध मधील शिवाजी विद्या मंदिर शाळेत पुन्हा ‘किलबिलाट’ … प्रशालेने केले विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत!

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.४ ) : जनता शिक्षण संस्थेच्या शिवाजी विद्यामंदिर औंध प्रशालेत आज ५ वी ते ८ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.  कित्येक महिन्यांनी शाळा भरल्यावर ‘घरट्यातून उडून गेलेली पाखरे परत घरट्यात आली, किलबिल चालू झाली’ अशी भावना प्रत्येक शिक्षकांच्या चेहऱ्यावर दिसून आली.

शाळा व्यवस्थापनाकडून करोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला. जवळपास दहा महिन्यानंतर शाळेत येता आल्याने व शिक्षकांची प्रत्यक्ष भेट झाल्याने विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचे, उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शाळेत येण्यासाठी पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे. पहिल्या दिवशी वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नेहमीच्या तुलनेत थोडी कमी होती. विद्यार्थी वाहतुकीबाबत निर्णय झाल्यावर विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल.

Google Ad

यावेळी प्राचार्य विश्वास जाधव, उपप्राचार्य राजू दिक्षित, पर्यवेक्षिका भारती पवार तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख बिपीन बनकर, मिनल घोरपडे, सुधाकर कांबळे,कांचन घुले , इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

17 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!