Google Ad
Editor Choice Pune District

Jejuri : जेजुरी गडावर राजमाता अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा … या दिवशी, शरद पवारांच्या हस्ते होणार अनावरण!

महाराष्ट्र 14 न्यूज : अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा गडावर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला गेला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते येत्या 13 फेब्रुवारीला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे.

जेजुरी गडावर जाणाऱ्या पायरी मार्गावर जेजुरी देवस्थानने हा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. जेजुरी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं तब्बल 20 फूट उंचीचा ब्रांझ धातूचा अहिल्यांबाईंचा पुतळा उभारण्यात आला आहे. याच पुतळ्याचं अनावरण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्याला छत्रपतींचे वंशज खासदार संभाजीराजे, होळकर घराण्याचे 16 वे वंशज यशवंतराव होळकर, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, पुरंदरचे आमदार संजय जगताप, तसंच महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

Google Ad


गडाचा जिर्णोद्दार करण्यासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या राजमातांचा पुतळा देवस्थानाच्या वतीने उभारण्यात आलेला आहे. देवस्थान कमिटी कायमच राजमातांच्या क्रांतीकारी विचाराचा वसा घेऊन चालत आहे. चौथऱ्यासह सुमारे 20 फूट उंचीचा पुतळा देवस्थानामार्फत उभारण्यात आला आहे. यासाठी तब्बल 55 लाख रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या विविध परवानग्या घेऊन लोकनेते शरद पवार यांच्याहस्ते अनावरण होणार” असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

16 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!