Google Ad
Editor Choice Pune

Pune : स्वत:च्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी अधिकाधिक जणांनी ‘पुणे म्हाडा’च्या लॉटरी योजनेत अर्ज करा …

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.१३ एप्रिल ) : सामान्य लोकांना परवडेल अशा दरात पुण्यातील 2,890 घरांसाठी ‘म्हाडा’कडून सोडत जाहीर करण्यात आली आहे. या लॉटरीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी अर्ज करण्याच्या प्रक्रियेचे उद्घाटन केले ‘सर्वांसाठी घरं’ हे शासनाचं धोरण असून ‘पुणे म्हाडा’ने आणलेली 2 हजार 890 घरांची लॉटरी हे त्या दिशेनं पडलेलं आश्वासक पाऊल आहे.

Google Ad

‘म्हाडा’ची लॉटरी योजना पूर्णपणे पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त असून कुणाच्याही खोट्या आश्वासनाला व फसवणुकीला बळी पडू नका. स्वत:च्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी अधिकाधिक जणांनी ‘पुणे म्हाडा’च्या लॉटरी योजनेत अर्ज करा, असं आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. या ऑनलाईन कार्यक्रमाला गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवास, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर (सर्वजण ऑनलाईन पध्दतीने) आदी मान्यवर उपस्थित होते.

🔴 नवी सांगवी फेमस चौक येथे 1 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे.
संपर्क : – 8️⃣9️⃣9️⃣9️⃣2️⃣8️⃣4️⃣8️⃣9️⃣5️⃣

🔴29 मे रोजी लॉटरी निघणार

ऑनलाईन अर्ज नोंदणी 13 मे, 2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत करता येणार आहे. त्यानंतर 29 मे रोजी लॉटरी काढली जाईल. यामध्ये पुणे जिल्हयात म्हाळूंगे येथे 209, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे 432 अशा एकूण 641 सदनिकांचा समावेश आहे. या सर्व सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहेत.

🔴‘म्हाडाच्या लॉटरी प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका’

‘म्हाडा’च्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना माफक दरात दर्जेदार व हक्काची घरे मिळवून देण्याचा प्रयत्न सुरु आहे. ‘म्हाडा’ची सोडत प्रक्रिया पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त आहे. त्यामुळे कुठल्याही आमिषाला किंवा फसवणुकीला बळी पडू नये. जर कुणी असा प्रयत्न केला तर त्याच्याविरुद्ध तक्रार करावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.

उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या, मराठी नववर्षाच्या तसेच उद्यापासून सुरु होत असलेल्या रमजान महिन्याच्याही शुभेच्छा दिल्या. राज्यावरील कोरोनाचं संकट लक्षात घेता सामजिक अंतर राखणे, हात वारंवार धुणे आणि मास्क वापरणे या त्रिसुत्रीचं तसेच ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केलं.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!