Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

Pune : शहरातील आजपर्यंतची सर्वांत मोठी कारवाई … पिस्तुले , काडतुसांचा मोठा साठा जप्त !

महाराष्ट्र 14 न्यूज : बेकायदा पद्धतीने विक्रीसाठी आणलेली गावठी बनावटीची १८ पिस्तुले आणि २७ जिवंत काडतुसे हडपसर पोलिसांनी जप्त केली . या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून ते २१ ते २८ या वयोगटातील आहेत . त्यांच्याकडून पाच लाख ६८ हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे . पुणे शहरात एकत्रितपणे इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदा शस्त्रसाठा पकडण्याची ही आजपर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे , अशी माहिती झोन ५ चे पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांनी पत्रकार परिषदेत दिली .

चार आरोपी हे शिरूर परिसरातील असून , त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न , बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत . अरबाज रशीद खान ( वय २१ ) , कुणाल नामदेव शेजवळ उर्फ यश ( वय १ ९ ) , जयेश राजू गायकवाड उर्फ जय ( वय २३ ) , शरद बन्सी मल्लव ( वय २१ , चौघे रा . शिरूर , जि . पुणे ) सूरज रमेश चिंचणे उर्फ गुळ्या ( वय २२ , रा . गंगानगर , फुरसुंगी )

Google Ad

विकास भगत तौर उर्फ महाराज ( वय २८ , रा . लक्ष्मीनगर , येरवडा ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत . हडपसर येथील कानिफनाथ वस्ती , फुरसुंगी येथे पाच ते सहा तरुण उभे असून त्यांच्या सर्वांच्याच कमरेला पिस्तूल असल्याची माहिती हडपसर पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील कर्मचारी नितीन मुंढे यांना मिळाली . सहायक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते , वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!