Google Ad
Editor Choice Pune District

Mumbai : एका दिवसात ३२ हजार रुग्ण कोरोना मुक्त … कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची रेकॉर्ड ब्रेक नोंद!

महाराष्ट्र 14 न्यूज : एकीकडे कोरोनाच्या संसर्गाचा कहर वाढत असताना. महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त झालेल्या रुग्ण संख्येची विक्रमी नोंद झाली आहे. आज ( ता. 21 सप्टेंबर ) 32 हजार 7 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण 9 लाख 16 हजार 348 रुग्ण बरे झाले आहेत.

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.84 टक्के इतके नोंदवले गेले. आज बरे झालेल्या रुग्णांपेक्षा निम्म्या संख्येने नवीन रुग्णांचे निदान झाले. आज राज्यात 15 हजार 738 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या देखील कमी होऊन 2 लाख 74 हजार 623 ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Google Ad

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 59 लाख 12 हजार 258 नमुन्यांपैकी 12 लाख 24 हजार 380 नमुने पॉझिटिव्ह म्हणजे 20.71 टक्के आले आहेत. राज्यात 18 लाख 58 हजार 924 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. सध्या 35 हजार 517 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 344 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.7 टक्के एवढा आहे.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!