Google Ad
Editor Choice Pune

Pune : पुणे पोलीस आयुक्तालयाजवळ गोळीबार … बांधकाम व्यावसायिकाचा खून

महाराष्ट्र 14 न्यूज : शहरात भर दिवसा पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर गोळीबार करुन एका बांधकाम व्यावसायिकाचा खुन करण्यात आला . जिल्हाधिकारी कार्यालया शेजारील स्टेट बँकेसमोरील फुटपाथवर दुपारी तीन वाजता ही घटना घडली . राजेश हरिदास कानाबार ( वय ४५ , रा . घोरपडी ) असे खून झालेल्याचे नाव आहे.कानाबार यांचा काही जणांशी जागेवरुन वाद सुरु होता.

जागेच्याबाबत त्यांची न्यायालयात आज तारीख असल्याची माहिती मिळाली . ते जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील स्टेट बँकेसमोरील फुटपाथवर उभे असताना मोटारसायकलवरुन दोघे जण आले . त्यांच्यापैकी एकाने आपल्याकडील पिस्तुलातून कानाबार यांच्यावर गोळीबार केला आणि ते पळून गेले.गोळी लागल्याने जखमी झालेल्या कानाबार यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले .

Google Ad

परंतु उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यु झाला.या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस आयुक्त अशोक मोरोळे , डॉ . संजय शिंदे , उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्यासह बंडगार्डन पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहचले.पोलिसांनाहल्लेखोरांची नावे समजली असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!