Google Ad
Editor Choice Pune

पुणेकरांनो सावधान : कोरोना वाढतोय, दुर्दैवाने जम्बो कोविड रुग्णालय पुन्हा सुरू करण्याची आली वेळ!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२मार्च) : पुण्यातील शिवाजीनगर येथील सीओईपी ग्राऊंडवरील जम्बो कोविड रुग्णालयात मंगळवारपासून रुग्ण दाखल करून घेण्याला सुरूवात केली जाणार असून, सुरूवातीला अडीचशे बेडची व्यवस्था केली जाणार असून, शुक्रवारपर्यंत 500 बेडची व्यवस्था पूर्ण होईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी दिली.

यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे, जम्बो व्यवस्थापक आदी यावेळी उपस्थित होते. या सगळ्यांनी सोमवारी जम्बो ची एकत्रित पाहणी केली. जम्बो रुग्णालय पुन्हा सुरू करण्याची वेळ दुर्दैवाने आली आहे. अशी वेळ येईल म्हणूनच हे रुग्णालय बंद न करण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता.

Google Ad

प्राथमिक स्तरावर 8 ते 10 दिवसांत 500 बेडची व्यवस्था याठिकाणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये 250 ऑक्सिजन बेड, 200 आयसोलेशन बेड आणि 50 आयसीयु बेडची व्यवस्था येथे करण्यात येणार आहे. सोमवारी तातडीने 55 बेड सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये 25 ऑक्सिजन, 25 सीसीसी आणि पाच आयसीयु बेडचा समावेश असल्याचे मोहोळ म्हणाले.

बुधवारी आणखी 100 ऑक्सिजन बेड, 75 आयसोलेशन बेड आणि 20 आयसीयु बेड सुरू करण्यात येणार आहेत. शुक्रवारी 125 ऑक्सिजन बेड, 100 आयसोलेशन बेड आणि 25 आयसीयु बेड सुरू करत आहोत. एका आठवड्यात या हॉस्पिटलमध्ये 500 बेड तयार होतील, असे मोहोळ यांनी नमूद केले. खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींबरोबरही महापालिका आयुक्तांनी बैठक घेतली आहे.

संसर्ग वाढत चालला आहे. कोविड विषयक यंत्रणा कमी पडणार नाही; परंतु ती वापरण्याची वेळ येऊ नये यासाठी नागरिकांनी सुरक्षेविषयी अधिक काळजी घेतली पाहिजे. जंबो मध्ये जे आयसीयु बेड आहेत त्यामध्ये जंबो मध्ये आयसोलेशन मध्ये किंवा ऑक्सिजनवर असलेला रुग्ण गंभीर झाल्यास त्याला शिफ्ट केले जाणार आहे. बेडची कमतरता आता आपल्याकडे नाही, असे मोहोळ म्हणाले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

32 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!